-
करोनानं हवाईमार्गे भारतात पाऊल ठेवलं. त्यानंतर हळूहळू देशभरात पसरत चालला आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारनं देशात लॉकडाउन लागू केला. बिलकुल बाहेर पडायचं नाही. फक्त घरात बसायचं आणि करोनाचा संसर्ग रोखायचा. मग २१ दिवस करायचं काय? या प्रश्नानं मूळ धरलं आणि मागणी पुढे आली की ज्यामुळे रस्त्यांवर शुकशुकाट व्हायचा त्या रामायण, महाभारत मालिका पुन्हा सुरू करा. हळूहळू त्या काळातील इतरही मालिका सुरू करण्यात आल्या. त्याच्या वेळाही प्रसारभारतीनं जाहीर केल्या असून, प्रक्षेपणही सुरू झालं आहे. पण, तुमच्या मालिकेची वेळ माहिती आहे का? (फोटो : इंडियन एक्स्प्रेस)
-
रामायण, वेळ : दररोज सकाळी ९ वाजता आणि रात्री ९ वाजता.
-
ब्योमकेश बक्शी, वेळ : दरोरज सकाळी ११ वाजता.
-
महाभारत (डीडी भारती), वेळ : दररोज दुपारी १२ वाजता आणि रात्री ७ वाजता.
-
अलिफ लैला, वेळ : दररोज सकाळी १०.३० आणि रात्री ९ वाजता.
-
बुनियाद, वेळ : दररोज सायंकाळी ५ वाजता.
-
चाणक्य, वेळ : दररोज रात्री १० वाजता.
-
शक्तीमान, वेळ : दररोज दुपारी १ वाजता.
-
श्रीमान श्रीमती, वेळ : दररोज संध्याकाळी ४ वाजता.
-
तू तोता मैं मैना, वेळ : दररोज रात्री १०:३० वाजता.
तुमच्या आवडत्या मालिकेचं टायमिंग काय?
Web Title: Lockdown coronavirus all the shows which have returned to the small screen during lockdown bmh