-
संपूर्ण जगामध्ये करोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे भीतीचं वातावरण आहे. अगदी धार्मिक विधींपासून ते वैज्ञानिक संशोधनापर्यंत अनेक मार्गांच्या माध्यमातून करोनावर मात करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. असं असतानाच काही दिवसांपूर्वी जापानमध्ये बौद्ध धर्मियांसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या एका अती भव्य मुर्तीला मास्क घालण्यात आलं. (सर्व फोटो रॉयटर्सवरुन साभार)
-
रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार हे मास्क या मुर्तीवर लावण्यासाठी तब्बल तीन तास लागले.
-
चार लोकांनी रॅपलिंग करत या मुर्तीच्या तोंडाजवळ जाऊन हे मास्क लावण्याचं काम केलं.
-
या मुर्तीची उंची १८७ फूट इतकी आहे.
-
ही मुर्ती जपानमधील फुकुशिमा येथे आहे.
-
होकोकुजी आयझू बेटसुईन मंदिरातील ही मुर्ती आहे.
-
मुर्तीला लावण्यात आलेलं हे गुलाबी रंगाचं मास्क हे नेट फॅब्रिकपासून बनवण्यात आलं आहे.
-
हे मास्क १३.४५ फूट X १७.३८ फूट मापाचं आहे.
-
या मास्कचं वजन जवळजवळ ३४ किलो इतकं आहे.
-
ही मुर्ती ३३ वर्ष जुनी आहे.
-
या मुर्तीच्या आतील भागांमध्ये शिड्या आहेत.
-
या मुर्तीच्या खांद्यापर्यंत पर्यटकांना आणि भक्तांना जाता येतं.
-
येथील स्थानिक या मंदिरामध्ये खास करुन लहान मुलांसाठी प्रार्थना करण्यासाठी येतात.
या मुर्तीच्या हातात एक लहान मुलं आहे. -
या मुर्तीच्या हातात असणाऱ्या लहान बाळामुळेच येथे अनेकजण आपल्या होणाऱ्या बाळांसाठी प्रार्थना करायला येथे मोठ्या संख्येने भाविक येतात.
-
मुर्तीला मास्क लावल्यानंतरचा आणि आधी आधीचा हा फोटो पाहा.
-
येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मुर्तीला मास्क लावण्याची संकल्पाना सुचवल्याचं मंदिराचे व्यवस्थापक टाकाओमी होरीक्यूनी यांनी सांगितलं.
-
जोपर्यंत जपानमध्ये करोना नियंत्रणात येत नाही तोपर्यंत मुर्तीवर मास्क ठेवलं जाणार आहे.
-
लोकांनी मास्क लावूनच घराबाहेर पडावे हा संदेश देण्यासाठी हे मास्क लावण्यात आलंय.
-
हा मास्क लावण्याचा व्हिडीओ सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरलाय.
Photos: …म्हणून १८७ फूट उंच मुर्तीला घालण्यात आलं ३४ किलोचं मास्क; फोटो पाहून व्हाल थक्क
येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मुर्तीला मास्क लावण्याची संकल्पाना सुचवल्याचं व्यवस्थापकांनी सांगितलं. या मास्कची सध्या जगभरात चर्चा सुरु आहे.
Web Title: Giant buddhist goddess in japan gets face mask to pray for end of covid 19 scsg