• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • Ind Vs Pak Live Score
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. who is this indian actor playing the role of a pakistani boy in squid game ttg

‘Squid Game’ मध्ये पाकिस्तानी व्यक्तीच्या भूमिकेत दिसलेला ‘हा’ भारतीय अभिनेता आहे तरी कोण?

स्क्विड गेमची एक वेगळीच क्रेझ सुरू झाली आहे. या वेब सिरीजमध्ये पाकिस्तानी व्यक्तीच्या भूमिकेत दिसलेल्या अभिनेत्याचीही चर्चा सर्वत्र सुरु आहे.

October 25, 2021 09:55 IST
Follow Us
  • नेटफ्लिक्सवरील ‘स्क्विड गेम’ या वेब सीरिजने जगभरातील प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलंय.
    1/21

    नेटफ्लिक्सवरील ‘स्क्विड गेम’ या वेब सीरिजने जगभरातील प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलंय.

  • 2/21

    ऑक्टोबर २०२१ मध्ये स्क्विड गेम ही सिरीज रिलीज झाली.

  • 3/21

    अवघ्या महिन्याभरात १३ कोटींहून अधिक व्हूज मिळालेल्या स्क्विड गेमची एक वेगळीच क्रेझ सुरू झाली आहे.

  • 4/21

    आता जगभरात या सीरिजची चर्चा सुरूये. सीरीजसह यातील कलाकारही खूप चर्चेत आहेत.

  • 5/21

    सीरीजमधील भारतीय कलाकार अनुपम त्रिपाठी सध्या खूप चर्चेत आहेत.

  • 6/21

    स्क्विड गेममध्ये अनुपम त्रिपाठी यांनी पाकिस्तानी व्यक्ती अलीची भूमिका साकारली होती. या वेब सिरीजमुळे अनुपम त्रिपाठी यांना भारतातच नाही तर जगभरात लोकप्रियता मिळाली.

  • 7/21

    अनुपम त्रिपाठी यांनी अनेक चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये काम केले आहे, मात्र त्यांना खरी ओळख दक्षिण कोरियाच्या स्क्विड गेम या वेब सीरिजमधून मिळाली.

  • 8/21

    दक्षिण कोरियन वेब सिरीज स्क्विड गेममध्ये अली १९९ या पाकिस्तानी माणसाची भूमिका साकारण्यासाठी अनुपम त्रिपाठी प्रसिद्ध झाला आहेत.

  • 9/21

    या व्यक्तिरेखेद्वारे अनुपम त्रिपाठी यांनी जगभरातील स्क्विड गेम पाहणाऱ्या प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

  • 10/21

    अनुपम त्रिपाठी यांचा जन्म कुठे झाला?, अनुपम त्रिपाठीला दक्षिण कोरियन वेब सीरिज स्क्विड गेममध्ये काम करण्याची संधी कशी मिळाली. अशा अनेक प्रश्नांची उत्तरं या सिरीजचे आणि अभिनेता अनुपम त्रिपाठीचे फॅन्स शोधत आहेत.

  • 11/21

    अनुपम त्रिपाठी यांचा जन्म २ नोव्हेंबर १९८८ रोजी देशाच्या राजधानी दिल्लीतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला.

  • 12/21

    अनुपम सध्या ३२ वर्षाचे आहेत.

  • 13/21

    अनुपम त्रिपाठी एक थिएटर आर्टिस्ट आहेत आणि त्यांनी २००६ ते २०२१ पर्यंत थिएटरमध्ये अनेक शोमध्ये काम केले आहे.

  • 14/21

    आपला अभिनय अजून छान करण्यासाठी अनुपम त्रिपाठी यांना नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेशही घ्यायचा होता.

  • 15/21

    एके दिवशी त्यांच्या एका मित्राने कोरिया नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ आर्ट्समध्ये प्रवेशासाठी आर्ट्स मेजर एशियन स्कॉलरशिपबद्दल माहिती दिली.

  • 16/21

    अनुपम त्रिपाठी यांनी परीक्षा दिली आणि ते यशस्वीही झाले. यानंतर अनुपम त्रिपाठी २०१० मध्ये कोरियाला गेले.

  • 17/21

    कोरियाला गेल्यानंतर अनुपम त्रिपाठी यांना सुरुवातीला भाषेची अडचण आली, पण २ वर्षांच्या मेहनतीनंतर त्यांनाही कोरियन भाषा बोलता आली.

  • 18/21

    ग्रॅज्युएशननंतर अनुपम त्रिपाठी यांनी चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये काम करण्यास सुरुवात केली.

  • 19/21

    ओड टू माय फादर – २०१४ , द फोन – २०१५ , लक-की – २०१६ , असुर: द सिटी ऑफ मॅडनेस – २०१६, हार्ट ब्लॅकन – २०१७ , मिस अँड मिसेस कॉप्स – २०१९, स्पेस स्वीपर्स – २०२१, द ८ नाईट – २०२१ अनुपम त्रिपाठी यांनी आतापर्यंत एवढ्या सिनेमात काम केले आहेत.

  • 20/21

    स्टेंजर फ्रॉम हेल – २०१९, हॉस्पिटल प्लेलिस्ट – २०२०, टॅक्सी ड्रायव्हर – २०२१, स्क्विड गेम – २०२१ एवढ्या सिरीजमध्ये काम केले आहेत.

  • 21/21

    आता अनुपम बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार की नाहीत याकडे अनेकांचं लक्ष लागलेले आहे. (सर्व फोटो:sangipaiya / Instagram )

TOPICS
पाकिस्तानPakistanमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Who is this indian actor playing the role of a pakistani boy in squid game ttg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.