• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पावसाळी अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. elon musk time person of the year 2021 the richest man in the world but not his own house because ttg

एलन मस्क ‘टाईम पर्सन ऑफ द इयर २०२१’; जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती पण स्वतःचे नाही घर कारण…

जगातील प्रसिद्ध मासिक टाइमने जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांची ‘टाईम्स पर्सन ऑफ द इयर २०२१’ म्हणून निवड केली आहे.

December 14, 2021 18:31 IST
Follow Us
  • टाइम मासिकाने या पुरस्काराची ही परंपरा १९२७ मध्ये सुरू केली. फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग आणि अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनाही यापूर्वी हा मान मिळाला आहे. (Source: Time.com)
    1/13

    टाइम मासिकाने या पुरस्काराची ही परंपरा १९२७ मध्ये सुरू केली. फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग आणि अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनाही यापूर्वी हा मान मिळाला आहे. (Source: Time.com)

  • 2/13

    जगातील प्रसिद्ध मासिक टाइमने जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांची ‘टाईम्स पर्सन ऑफ द इयर २०२१’ म्हणून निवड केली आहे. (फोटो: @TIME / Twitter )

  • 3/13

    एलन मस्क हे टेस्ला आणि स्पेसएक्स या कार कंपनीचे सीईओ आहेत. (Indian Express File Photo)

  • 4/13

    मॅगझिननुसार, एलन मस्क यांची निवड त्यांच्या अंतराळातील कामासाठी तसेच इलेक्ट्रिक कारसाठी करण्यात आली आहे. (फोटो: Reuters)

  • 5/13

    “एलन मस्क हे २०२१ मध्ये आपल्या समाजातील बदलाचे सर्वात मोठे उदाहरण आहेत.”असं टाइम मासिकाचे मुख्य संपादक एडवर्ड फेलसेन्थनल म्हणाले. (फोटो: Reuters)

  • 6/13

    टेस्लाचे बाजारमूल्य यावर्षी एक ट्रिलियन डॉलर्स (सुमारे ७६ लाख कोटी रुपये) पर्यंत वाढले आहे. (फोटो: AP)

  • 7/13

    कंपनीचे मूल्य आता फोर्ड मोटर आणि जनरल मोटर्सच्या एकत्रित मूल्यापेक्षा जास्त झाले आहे. (Photographer: Qilai Shen/Bloomberg)

  • 8/13

    टेस्ला दरवर्षी लाखो मोटारींचे उत्पादन करते आणि पुरवठा साखळीतही प्रतिस्पर्धी कंपन्यांपेक्षा चांगलं यश संपादन केलं आहे. (Source: Tesla)

  • 9/13

    जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीकडे स्वतःचे एकही घर नाही. इलॉन मस्क सतत सांगत होते की, त्यांना त्यांच्या घरासह स्वतःच्या वस्तू विकायच्या आहेत. (Image source: Bloomberg)

  • 10/13

    बिझनेस इनसाइडरने एका अहवालात म्हटले आहे की एलोन मस्कची सॅन फ्रान्सिस्को बे एरियामध्ये ४७ एकरची मालमत्ता आहे. MLSListing.com च्या मते, २ डिसेंबर रोजी ते 30 दशलक्ष डॉलर्समध्ये विकले गेले आहे. (AP Photo/Susan Walsh, File)

  • 11/13

    घर विकल्यानंतर एलन मस्ककडे स्वतःचे घर राहिले नाही. सध्या एलन मस्क भाड्याने राहतात. (फोटो: Indian Express)

  • 12/13

    वास्तविक, एलन मस्क म्हणाले होते की २०२५० पर्यंत त्यांना मंगळावर १० लाख लोकांना पाठवायचे आहे. तेथे वसाहत उभारण्यासाठी त्यांना त्यांची सर्व मालमत्ता विकायची आहे. असा त्यांचा विश्वास आहे . (Indian Express File Photo)

  • 13/13

    मे महिन्यात एलन मस्कने सांगितले की त्याला आपली सर्व मालमत्ता विकून मंगळावर वसाहत उभारायची आहे. भविष्यात मला कोणतेही घर सोबत ठेवायचे नाही, असेही त्यांनी सांगितले होते. ( Reuters Photo)

TOPICS
एलॉन मस्कElon Muskटेस्लाTeslaसोशल व्हायरलSocial Viral

Web Title: Elon musk time person of the year 2021 the richest man in the world but not his own house because ttg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.