• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. raj thackeray son amits wife mitali is pregnant expecting baby in april scsg

Photos: अमित ठाकरे होणार बाबा तर राज होणार आजोबा; जाणून घ्या राज ठाकरेंच्या सूनबाईंबद्दलच्या काही खास गोष्टी

काही महिन्यांपूर्वीच राज हे त्यांच्या ‘कृष्णकुंज’ निवासस्थानावरुन सहकुटुंब ‘शिवतीर्थ’ या नव्या निवासस्थानी रहायला गेले आहेत.

March 2, 2022 17:24 IST
Follow Us
  • Raj Thackeray Son Amits wife mitali is pregnant expecting baby in April
    1/16

    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे लवकरच नव्या भूमिकेत दिसणार आहे. अर्थात ही भूमिका कोणतीही राजकीय भूमिका नसून वैयक्तिक आयुष्यामध्ये राज ठाकरेंचं आजोबा म्हणून प्रमोशन होणार आहे.

  • 2/16

    राज यांचे सुपुत्र अमित ठाकरे आणि सूनबाई मिताली अमित ठाकरेंकडे गोड बातमी असल्याचं वृत्त आहे.

  • 3/16

    नुकतीच अमित ठाकरेंना मनसेच्या विद्यार्थी सेनेची जबाबदारी देण्यात आली आहे. अशातच आता ही खासगी आयुष्यामधील प्रमोशनची बातमी समोर आलीय.

  • 4/16

    राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या नवीन निवासस्थानी सध्या या नव्या पाहुण्याच्या आगमनाची तयारी सुरु असल्याचे समजते.

  • 5/16

    राज आणि त्यांच्या पत्नी म्हणून आजी होणाऱ्या शर्मिला ठाकरे हे या बातमीमुळे फार आनंदात असून एप्रिल महिन्यात ठाकरे कुटुंबातील पुढच्या पिढीतील पाहुण्याचे आमगन होणार असल्याची माहिती समोर आलीय.

  • 6/16

    काही महिन्यांपूर्वीच राज हे त्यांच्या ‘कृष्णकुंज’ निवासस्थानावरुन सहकुटुंब ‘शिवतीर्थ’ या नव्या निवासस्थानी शिफ्ट झाले.

  • 7/16

    याच नवीन घरामध्ये अमित आणि मिताली यांच्या बाळाचं आगमन होणार आहे. याच घरात आता चिमुकली पावलं खेळताना बागडताना दिसणार आहेत.

  • 8/16

    अमित ठाकरे यांचा विवाह २७ जानेवारी २०१९ रोजी मिताली बोरुडे यांच्याशी झाला.

  • 9/16

    अमित यांच्या लग्नाला राजकीय नेत्यांसह, उद्योग, चित्रपट तसेच इतर क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. लोअर परळ येथील येथील सेंट रेजिस या आलिशान हॉटेलमध्ये हा विवाहसोहळा पार पडला होता.

  • 10/16

    २०१८ मध्ये डिसेंबर महिन्यात अमित आणि मिताली यांचा साखरपुडा पार पडला होता.

  • 11/16

    मिताली बोरुडे फॅशन डिझायनर आहे. मिताली यांनी फॅड इंटरनॅशनलमधून फॅशन डिझायनिंगचे शिक्षण घेतले आहे

  • 12/16

    मिताली यांचे वडील संजय बोरुडे हे प्रसिद्ध सर्जन आहेत.

  • 13/16

    राज ठाकरेंची कन्या उर्वशी आणि मिताली यांची चांगली मैत्री आहे. काही वर्षांपूर्वी या दोघींनी मिळून ‘द रॅक’ हा कपड्यांचा ब्रॅण्ड लॉन्च केला होता.

  • 14/16

    मिताली यांच्या परिवाराचे ठाकरे कुटुंबासोबत घरोब्याचे संबंध लग्नापूर्वीपासून आहेत.

  • 15/16

    अमित आणि मिताली यांच्या लग्नाच्या वेळेत मिताली यांचे फोटो सोशल मीडियावर फार चर्चेत होते.

  • 16/16

    याच ओळखीचे रुपांतर पुढे प्रेमात झाले आणि नंतर दोघंही विवाहबंधनात अडकले होते. (फोटो सोशल मीडियावरुन साभार)

TOPICS
मनसेMNSमराठी बातम्याMarathi Newsराज ठाकरेRaj Thackeray

Web Title: Raj thackeray son amits wife mitali is pregnant expecting baby in april scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.