• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • मराठवाडा
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. corona outbreak in china strict lockdown in these three cities pvp

Photos : चीनमध्ये करोनाने पुन्हा डोकं वर काढलं; ‘या’ तीन शहरामध्ये कडक लॉकडाउन

शनिवारी चीनमध्ये कोरोना विषाणूच्या दैनंदिन प्रकरणांची नोंद झाली, जी दोन वर्षांतील सर्वाधिक संख्या आहे.

March 15, 2022 19:44 IST
Follow Us
  • जगभरातील देशांना कोरोना महामारीच्या विळख्यात आणणाऱ्या चीनमध्ये सध्या या संसर्गाने कहर केला आहे. चीनमध्ये गेल्या दोन वर्षांतील सर्वांत मोठी रुग्णवाढ पाहायला मिळत आहे. (Photo : Reuters)
    1/15

    जगभरातील देशांना कोरोना महामारीच्या विळख्यात आणणाऱ्या चीनमध्ये सध्या या संसर्गाने कहर केला आहे. चीनमध्ये गेल्या दोन वर्षांतील सर्वांत मोठी रुग्णवाढ पाहायला मिळत आहे. (Photo : Reuters)

  • 2/15

    शनिवारी चीनमध्ये कोरोना विषाणूच्या दैनंदिन प्रकरणांची नोंद झाली, जी दोन वर्षांतील सर्वाधिक संख्या आहे. (Photo : ANI)

  • 3/15

    अधिकाऱ्यांनी सांगितले की, सुमारे दोन हजार नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत, ज्यामध्ये राजधानी बीजिंगमध्ये २० लोकांना संसर्ग झाल्याचे आढळले आहे. (Photo : AP)

  • 4/15

    त्याच वेळी, रविवारी चीनमध्ये विक्रमी ३,३९३ नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. चीनमध्ये जवळपास दोन वर्षांनंतर पहिल्यांदाच कोरोना संसर्गाची ३३०० हून अधिक प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. (Photo : AP)

  • 5/15

    नॅशनल हेल्थ कमिशनच्या म्हणण्यानुसार, फेब्रुवारी २०२० नंतर संसर्गाचा हा सर्वात मोठा दैनिक आकडा आहे. (Photo : Reuters)

  • 6/15

    चीनच्या जिलीन प्रांताची राजधानी चांगचूनमध्ये शुक्रवारपासूनच लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. अशात शहरातील ९० लाख लोकांना आपत्कालीन अलर्टनंतर घरातच राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (Photo : AP)

  • 7/15

    शेडोंग प्रांतातील जवळपास ५ लाख लोकसंख्या असलेल्या युचेंगमध्ये देखील लॉकडाऊनचे आदेश देण्यात आले आहेत. (Photo : AP)

  • 8/15

    मिळालेल्या माहितीनुसार, जिनपिंग सरकारने दक्षिण चीनच्या टेक्नॉलॉजिकल हब शेन्झेनमध्ये १४ मार्चपासून कडक लॉकडाउन जारी केले आहे. यामुळे शहरातील जवळपास १,७०,००,००० लोक आपल्या घरातच बंदिस्त असतील. (Photo : AP)

  • 9/15

    यामुळे चीनमधील एकूण ३ शहरे लॉकडाउनमध्ये असून २,६५,००,००० लोकांना आपल्या घरात बंदिस्त राहावे लागणार आहे. (Photo : Indian Express File Photo)

  • 10/15

    शेन्झेन हे शहर हाँगकाँगच्या सीमेला लागून आहे, जिथे आधीच मोठ्या संख्येने लोकांना करोनाची लागण झाली आहे. (Photo : AP)

  • 11/15

    हाँगकाँगमध्ये अधिकाऱ्यांनी करोनाविषाणूच्या २७,६४७ नव्या प्रकरणांची पुष्टी केली आहे. यामुळे येथील परिस्थिती आणखीनच बिकट होत चालली आहे असे दिसत आहे. (Photo : Reuters)

  • 12/15

    हाँगकाँगमध्ये आणखी ८७ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, त्यानंतर संसर्गामुळे मृतांची संख्या ३,७२९ झाली आहे. (Photo : Reuters)

  • 13/15

    शांघायमध्ये शाळा-उद्याने बंद करण्यात आली असून बीजिंगमध्ये निवासी भागात प्रवेशावर बंदी घालण्यात आली. (Photo : AP)

  • 14/15

    नवीन प्रकरणे प्राप्त झाल्यानंतर, बीजिंगमधील प्रशासनाने लोकांना घराबाहेर न पडण्यास सांगितले आहे. (Photo : AP)

  • 15/15

    अगदी अत्यावश्यकतेशिवाय शहराबाहेर न जाण्याच्या सूचनाही लोकांना देण्यात आल्या आहेत. (Photo : Reuters)

TOPICS
करोनाCoronaकरोना विषाणूCoronavirusचीन करोनाChina CoronaलॉकडाउनLockdown

Web Title: Corona outbreak in china strict lockdown in these three cities pvp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.