-
आपण बऱ्याचदा बँकेत चेक स्वरुपात आर्थिक व्यवहार करत असतो. परंतु, अनेकदा असं घडतं की, कोणीतरी आपल्याला चेक देतो, पण त्याच्या खात्यात पैसे नसल्यामुळे तो चेक बाऊन्स होतो. दुसऱ्याच्या खात्यात पैसे नसल्यामुळे आपल्याला त्रास सहन करावा लागतो आणि पैसे मध्येच अडकून राहतात. अशावेळी आपण कायदेशीर कारवाई करू शकतो. (फोटो- फायनान्शिअल एक्स्प्रेस)
-
चेक बाऊन्सची प्रकरणं हाताळणाऱ्या वकीलाच्या मते, तुम्हाला एखाद्याने दिलेला चेक बाऊन्स झाला असेल तर तुम्ही त्याच्याविरोधात खटला दाखल करू शकता. (फोटो- फायनान्शिअल एक्स्प्रेस)
-
कलम १३८ नुसार संबंधितावर न्यायालयात तक्रार दाखल केली जाऊ शकते. (फोटो- फायनान्शिअल एक्स्प्रेस)
-
अशा प्रकरणात दोषी आढळल्यास संबंधित व्यक्तीला चेकवरील रकमेच्या दुप्पट रक्कम दंड स्वरुपात द्यावी लागू शकते किंवा २ वर्षांच्या कारावासाची तरतूद आहे. (फोटो- इंडियन एक्स्प्रेस)
-
कायदेशीर तक्रार दाखल करण्यासाठी चेक बाऊन्स झाल्यानंतर ३० दिवसांच्या आत कायदेशीर नोटीस द्यावी लागते. (फोटो- फायनान्शिअल एक्स्प्रेस)
-
नोटीस मिळाल्यानंतर आरोपींना १५ दिवसांची मुदत दिली जाते. त्यानंतरही धनादेशाची रक्कम न दिल्यास १६ व्या दिवसांपासून ३० दिवसांच्या आत न्यायालयात तक्रार द्यावी लागते. त्यानंतर न्यायालय त्यावर निर्णय घेते. (फोटो- इंडियन एक्स्प्रेस)
-
यासोबतच चेक दिल्यानंतर ‘स्टॉप पेमेंट’ केल्यास चेक देणाऱ्यावर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. संबंधित व्यक्तीविरोधात कलम ४२०, ४६७, ४६८ नुसार गुन्हा दाखल करता येतो. त्यामुळे कोणताही चेक देण्यापूर्वी अनेक गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. (फोटो- इंडियन एक्स्प्रेस)
Cheque Bounce Rules: तुम्हाला दिलेला चेक बाऊन्स झाल्यास काय कराल? जाणून घ्या सोपी प्रक्रिया
आपण बऱ्याचदा बँकेत चेक स्वरुपात आर्थिक व्यवहार करत असतो. परंतु, अनेकदा असं घडतं की, कोणीतरी आपल्याला चेक देतो, पण त्याच्या खात्यात पैसे नसल्यामुळे तो चेक बाऊन्स होतो.
Web Title: Cheque bounce rules what will you do if your cheque bounces know legal process rmm