• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. pm modi meet mother hriaba as she enters her 100th year scsg

Photos: आजचा दिवस पंतप्रधान मोदींसाठी फारच खास… आईच्या पायाशी जाऊन बसले; फोटो शेअर करत म्हणाले, “आज मी…”

पंतप्रधान मोदींनी शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून हजारोंच्या संख्येने त्याला रिट्विट्स आहेत.

Updated: December 28, 2022 16:48 IST
Follow Us
  • PM Modi Meet his mother hriaba as she enters her 100th year
    1/9

    पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी आजचा दिवस फारच खास आहे. त्यामुळेच आज त्यांनी त्यांच्या मातोश्री हिराबेन मोदींची भेट घेतली. मोदींसाठी आजचा दिवस खास असण्याचं कारण म्हणजे आज त्यांच्या आईचा वाढदिवस आहे. आज हिराबेन या वयाच्या १०० व्या वर्षात पदार्पण करत असून त्यानिमित्त मोदींनी आईची भेट घेतल्याचा फोटो ट्विटरवरुन पोस्ट केले आहेत.

  • 2/9

    हिराबा या नावानेही अनेकजण हिराबेन यांना ओळखतात. पंतप्रधान मोदींनी पोस्ट केलेल्या काही फोटोंमध्ये ते आईचे पाय धुताना दिसत आहेत. मोदींनी या फोटोंना एक छान कॅप्शनही दिली आहे.

  • 3/9

    “आज मी आईचे आशिर्वाद घेतले. आज ती १०० व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे,” अशी कॅप्शन मोदींनी या फोटोंना दिली आहे.

  • 4/9

    या कॅप्शनसोबत शेअर केलेल्या फोटोंमध्ये पंतप्रधान मोदी हिराबा आसनस्थ झालेल्या खुर्चीच्या जवळ बसलेले दिसत असून ते आईशी हसून चर्चा करत आहेत.

  • 5/9

    का फोटोत आई त्यांना गोड पदार्थ खावू घालताना दिसतेय. तर अन्य एका फोटोमध्ये मोदी आईचा आशिर्वाद घेताना दिसत आहेत.

  • 6/9

    मोदींनी ही मागील काही महिन्यांमधील आईची घेतलेली दुसरी भेट आहे. यापूर्वी ते मार्च महिन्यात त्यांच्या आईला भेटले होते. पंतप्रधान मोदींनी आज आईच्या वाढदिवसानिमित्त शेअर केलेले हे फोटो अल्पावधीत व्हायरल झाले असून पोस्ट केल्यानंतर काही मिनिटांमध्ये त्यांना सव्वापाच हजारांहून अधिक वेळा रिट्विट करण्यात आलंय.

  • 7/9

    उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणिपूर आणि पंजाब या पाच राज्यांमधल्या निवडणुकांचे निकालानंतर याच वर्षी मार्च महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या आईची भेट घेतली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ११ मार्च रोजी रात्री नऊच्या सुमारास हिराबा यांची त्यांच्या अहमदाबाद इथल्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती.

  • 8/9

    गुजरातच्या दोन दिवसीय दौऱ्यादरम्यान त्यांनी ही भेट घेतली होती. करोना प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्षे पंतप्रधान त्यांच्या आईला भेटले नव्हते. मार्च महिन्यातील ही भेट दोन वर्षांमधील पहिलीच भेट ठरली होती.

  • 9/9

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे धाकटे बंधू पंकज मोदी यांच्या गांधीनगरजवळच्या रायसन भागातील निवासस्थाला भेट दिली होती. पंतप्रधान मोदी यांच्या आई हिराबा या सध्या इथंच राहत आहेत. रात्री नऊच्या सुमारास पंतप्रधान मोदी आपली सर्व कामं संपवून घरी गेले. त्यावेळी मोदी यांनी आपल्या आईचे आशिर्वाद घेतले आणि त्यांच्यासोबत जेवणही केलं होतं. (फोटो एएनआय आणि ट्विटरवरुन साभार)

TOPICS
नरेंद्र मोदीNarendra Modiपंतप्रधान नरेंद्र मोदीPM Narendra Modiभारतीय जनता पार्टी बीजेपीBharatiya Janata Party Bjp

Web Title: Pm modi meet mother hriaba as she enters her 100th year scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.