• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. devendra fadnavis nitin gadkari meet at nagpur airport scsg

Photos: …अन् देवेंद्र फडणवीस विमानतळावर सर्वांसमोर नितीन गडकरींच्या पडले पाया

देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वीच राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे

Updated: July 6, 2022 17:48 IST
Follow Us
  • Devendra Fadnavis Nitin Gadkari meet at nagpur airport
    1/18

    राज्याचे नवनियुक्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज नागपूरमधून मुंबईला परतले.

  • 2/18

    उपमुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्या नागपूर मतदारसंघामध्ये मतदारांचे आभार माननण्यासाठी मंगळवारी फडणवीस नागपूरमध्ये दाखल झाले होते.

  • 3/18

    नागपूरचा आपला हा दोन दिवसांचा आभार प्रदर्शनाचा दौरा संपवून मुंबईला परतताना त्यांना विमानतळावरच एक फार खास व्यक्ती भेटली. ती व्यक्तीमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी.

  • 4/18

    फडणवीस हे एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या ४० बंडखोर आमदारांबरोबर सरकार स्थापन केल्यानंतर मंगळवारी पहिल्यांदाच आपल्या मतदार संघात पोहोचले होते.

  • 5/18

    फडणवीस यांचे मंगळवारी नागपूर येथे अकरा वाजता आगमन झाले. विमानतळावर हजारोच्या संख्येने जमलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. विमानतळावरुन बाहेर येतानाच त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली.

  • 6/18

    त्यानंतर विमानतळ ते त्यांच्या घरापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली.

  • 7/18

    विमानतळावर स्वागत केल्यानंतर वर्धामार्गावरील हेडगेवार स्मारकाजवळ त्यांचे कार्यकर्त्यांनी स्वागत केले. यावेळी फटाकांची आतिषबाजी करण्यात आली.

  • 8/18

    रस्त्यादवर दुतर्फा फडणवीस यांच्या स्वागताचे फलक लावण्यात आले होते.

  • 9/18

    या मिरणुकीला मोठ्या संख्येनं नागपूरकर हजर होते. भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी स्कूटर मिरवणूक काढली.

  • 10/18

    यावेळी आमदार चंद्रशेखर बावनकुळे आमदार परिणय फुके, आमदार प्रवीण दटके, आमदार टेकचंद सावरकर,आमदार आशिष जायस्वाल, आमदार कृष्णा खोपडे आमदार विकास कुंभारे,चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार, यांच्यासह मोठ्या संख्येने नागपूरकर उपस्थित होते.

  • 11/18

    फडणवीस यांच्या आई आणि घरातील इतर महिलांनी त्यांचं औक्षण केलं.

  • 12/18

    उपमुख्यमंत्री बनून परतलेल्या मुलाचं स्वागत फडणवीस कुटुंबियांनी अगदी कडकडून मिठी मारत केलं.

  • 13/18

    मंगळवार व बुधवारी उपमुख्यमंत्री नागपूर शहरात आपल्या कुटुंबासोबत होते. त्यांनी कुटुंबासोबतचे काही फोटोही पोस्ट केलेत.

  • 14/18

    आज फडणवीस दौरा संपवून मुंबईच्या दिशेने निघाले त्याचवेळी त्यांची भेट विमानतळावर नितीन गडकरींसोबत झाली. फडणवीस विमानतळावरुन निघण्याची आणि गडकरी नागपूरमध्ये दाखल होण्याची वेळ योगायोगाने जुळून आली आणि दोन्ही नेत्यांची अचानक भेट झाली.

  • 15/18

    केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे बुधवारी दुपारी दिल्लीवरुन नागपूरला आगमन झाले आणि त्याचवेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरवरुन मुंबईकडे रवाना होत होते.

  • 16/18

    यावेळी उपमुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्याबद्दल गडकरी यांनी त्याचे अभिनंदन केले.

  • 17/18

    त्यानंतर उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच गडकरींना भेटणाऱ्या फडणवीस त्यांच्या पाया पडले. फडणवीस विमानतळावर सर्वांसमोर नितीन गडकरींच्या पाया पडले. गडकरींनीही मायेनं पाठीवर हात ठेऊन त्यांना शबासकी आणि आशिर्वाद दिले.

  • 18/18

    फडणवीस यांनीच हे फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअऱ केले आहेत. आज नागपूर विमानतळावर माननीय नितीन गडकरींचे आशिर्वाद आणि शुभेच्छा स्वीकारल्या, असं फडणवीस यांनी पोस्टमध्ये म्हटलंय. (सर्व फोटो देवेंद्र फडणवीस यांच्या फेसबुक पेजवरुन साभार)

TOPICS
देवेंद्र फडणवीसDevendra FadnavisनागपूरNagpurनितीन गडकरीNitin Gadkari

Web Title: Devendra fadnavis nitin gadkari meet at nagpur airport scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.