• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. shivsena president uddhav thackeray happy birthday special love story wife rashmi thackeray family photos sdn

Uddhav Thackeray Birthday: रश्मी ठाकरेंना भेटण्यासाठी उद्धव ठाकरे डोंबिवलीला जायचे, असा आहे त्यांचा मैत्रीपासून ते जोडीदारापर्यंतचा प्रवास

उद्धव ठाकरेंच्या या प्रवासात त्यांना रश्मी ठाकरे यांची मोलाची साथ मिळाली.

July 27, 2022 10:39 IST
Follow Us
  • Uddhav Thackeray Birthday Rashmi Thackeray Love Story
    1/30

    Happy Birthday Uddhav Thackeray: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस.

  • 2/30

    उद्धव ठाकरे यांच्या आजच्या राजकीय यशामध्ये त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे महत्वपूर्ण योगदान आहे.

  • 3/30

    विशेष म्हणजे रश्मी ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे लग्न नेमके कसे झाले किंवा त्यांची पहिली भेट कशी झाली हे फार कमी जणांना माहित आहे.

  • 4/30

    या फोटो गॅलरीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्या पहिल्या भेटीविषयी.

  • 5/30

    रश्मी ठाकरे यांचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला.

  • 6/30

    रश्मी ठाकरे या मुळच्या डोंबिवलीकर आहेत.

  • 7/30

    त्यांचे माहेरचे नाव रश्मी माधव पाटणकर असे आहे.

  • 8/30

    मुलुंडच्या वझे-केळकर कॉलेजमधून रश्मी ठाकरे यांनी पदवी पर्यंतचे शिक्षण घेतले आहे.

  • 9/30

    रश्मी ठाकरे १९८७ साली ‘एलआयसी’मध्ये नोकरीवर रुजू झाल्या होत्या.

  • 10/30

    कंत्राटी स्वरुपाची ‘एलआयसी’मध्ये नोकरी होती.

  • 11/30

    ‘एलआयसी’मध्ये नोकरी करत असताना त्यांची जयवंती ठाकरे यांच्याबरोबर मैत्री झाली.

  • 12/30

    रश्मी ठाकरे आणि जयवंती ठाकरे या एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी होत्या.

  • 13/30

    जयवंती या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची बहीण आहेत.

  • 14/30

    जयवंती यांनी रश्मी आणि उद्धव ठाकरे यांची भेट घडवून आणली.

  • 15/30

    उद्धव ठाकरे त्यावेळी राजकारणात फारसे सक्रीय नव्हते ते फोटोग्राफी करायचे.

  • 16/30

    उद्धव ठाकरे यांनी एक अॅड एजन्सी सुद्धा सुरु केली होती.

  • 17/30

    रश्मी ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या ओळखीचं रूपांतर मैत्रीत झाले आणि हळूहळू ते एकमेकांच्या प्रेमात पडले.

  • 18/30

    रश्मी ठाकरेंनी अशी काही छाप पाडली होती की उद्धव ठाकरे त्यांना भेटण्यासाठी डोंबिवलीला जायचे.

  • 19/30

    उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्या रेशीमगाठी अशा जुळून आल्या. आणि त्यांनी १३ डिसेंबर १९८९ रोजी एकमेकांसोबत जन्मगाठ बांधली.

  • 20/30

    उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांना आदित्य आणि तेजस ही दोन मुले आहेत.

  • 21/30

    उद्धव ठाकरेंच्या या प्रवासात त्यांना रश्मी ठाकरे यांची मोलाची साथ मिळाली.

  • 22/30

    शांत आणि मितभाषी असणार्या रश्मी ठाकरे या एक उद्योजिका देखील आहेत.

  • 23/30

    रश्मी ठाकरे यांचा राजकीय निर्णयांमध्ये किती सहभाग आहे हे ठाऊक नाही. पण शिवसेनेच्या कठीण काळात त्यांनी पक्षाला बांधून ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

  • 24/30

    आजही शिवसेनेच्या सर्व कार्यक्रमांमध्ये उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांचा वावर असतो.

  • 25/30

    “रश्मी ठाकरे या मूळात शांत स्वभावाच्या आहेत. त्या मितभाषी असल्या तरी निश्चयी आहेत. त्या स्वत:ला नेहमी कामामध्ये गुंतवून ठेवतात” अशी माहिती त्यांचे काका दिलीप श्रृंगारपुरे यांनी दिली.

  • 26/30

    रश्मी ठाकरे यांच्यावर त्यांचे आई-वडिल आणि सासू-सासऱ्यांचा प्रभाव आहे.

  • 27/30

    “रश्मी यांचे आई-वडिल आणि सासू-सासऱ्यांबरोबर दृढ नाते आहे. कौटुंबिक संस्कारांमध्ये मुले घडतात यावर त्यांचा विश्वास आहे. त्यामुळेच सत्ता आणि लोकप्रियतेची हवा कधी त्यांच्या डोक्यात गेली नाही” असे दिलीप श्रृंगारपुरे यांनी सांगितले.

  • 28/30

    रश्मी ठाकरे सामनाच्या मुख्य संपादक म्हणून काम करत आहेत.

  • 29/30

    (सर्व फोटो सौजन्य : शिवसेना / ट्विटर)

  • 30/30

    (हेही पाहा : रुग्णालयात बेशुद्ध असताना सरकार पाडण्याचे प्रयत्न ते शिवसेना संपवायचा डाव, उद्धव ठाकरेंची २५ मोठी वक्तव्यं)

TOPICS
उद्धव ठाकरेUddhav Thackerayमहाराष्ट्रMaharashtraमुंबईMumbaiशिवसेनाShiv Sena

Web Title: Shivsena president uddhav thackeray happy birthday special love story wife rashmi thackeray family photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.