• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पावसाळी अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. viral posts eknath shinde stand in last row during photo of niti aayog meet scsg

Photos: ‘एकनाथ कुठं आहे?’, ‘महाशक्ती तुमच्या पुढे गेली शिंदे साहेब’, ‘फडणवीसांसमवेत पहिली रांग अन्…’; दिल्लीतील ‘तो’ फोटो चर्चेत

अगदी ‘धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे’ चित्रपटातील संवादांपासून ते खोचक टोल्यांपर्यंत अनेक प्रतिक्रिया या फोटोवर पहायला मिळत आहेत.

Updated: August 8, 2022 11:01 IST
Follow Us
  • Viral Posts Eknath Shinde Stand in last row during photo of Niti Aayog meet
    1/15

    नीति आयोगाच्या नियामक परिषदेच्या रविवारी झालेल्या बैठकीमधील एक फोटो सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. या बैठकीला उपस्थित असणाऱ्या सर्व मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नीति आयोगाच्या अधिकाऱ्यांचा हा फोटो असून या फोटोत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अगदी शेवटच्या रांगेत उभे असल्याचं दिसत आहे.

  • 2/15

    नीति आयोगाच्या बैठकीनंतर काढण्यात आलेल्या या फोटोमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शेवटच्या रांगेत स्थान देणे हा मराठीजनांचा अपमान आहे, अशी प्रतिक्रिया रोहीत पवार यांनी दिली आहे. “एकनाथ शिंदे हे मोठे नेते आहेत. तसेच ते देशाच्या अर्थव्यवस्थेचं इंजिन असलेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. तरीही त्यांना शेवटच्या रांगेत स्थान देणं योग्य नाही. प्रत्येक मराठी मनाला यामुळे नक्कीच दुःख झाले आहे. यापुढं असं होणार नाही याची दक्षता केंद्र सरकार घ्यावी”, असे ट्वीट रोहित पवार यांनी केले आहे. रोहित यांच्याबरोबरच इतर अनेक जणांनी या फोटोवरुन ट्विटरवरुन मत व्यक्त करताना अगदी फिल्मी स्टाइलपासून एकनाथ शिंदेंच्याच्या आधीच्या वक्तव्यांच्याही संदर्भ दिल्याचं चित्र दिसत आहे. जाणून घेऊयात या फोटोसंदर्भातील सोशल मीडियावरील चर्चा…

  • उपमुख्यमंत्री जातात जेव्हा आणि जात नाही तेव्हा म्हणत एकाने हे दोन फोटो शेअर केलेत
    हा फोटो पाहून अनेकांना ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटातील एकनाथ कुठंय हा संवाद आठवला.
    कुठे नेवून ठेवला महाराष्ट्र माझा? असा प्रश्न एकाने विचारला आहे.
    तुम्ही काढता पाय घ्यायला हवा होता, असा सल्ला एकाने मुख्यमंत्री शिंदेंना दिला आहे.
    महाशक्ती शिंदेंच्या मागून पुढे आलीय आणि ते मागे राहिलेत असा टोला एकाने लगावला आहे.
    शिंदे गट हा अपमान सहन करणार का? असा प्रश्न एकाने विचारला आहे.
    एकनाथ कुठं आहे? तिसऱ्या रांगेत उभा आहे असा खोचक टोला अन्य एकाने लगावला आहे.
    हे पाहून बाळासाहेब ठाकरे काय बोलले असतील असंही एका महिलेने फोटो पोस्ट करत विचारलं आहे.
  • 3/15

    हे अजून एक ‘एकनाथ कुठं आहे?’वालं मीम

  • 4/15

    या फोटोला एकाने गेला कुठं रं? शोधू कुठं रं अशी कॅप्शन दिली आहे.

  • 5/15

    रोहित पवार यांनी केलेल्या या ट्विटवरुन शिंदे गटातील आमदार उदय सामंत यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना अगदी शेवटच्या रांगेत उभं केलं आहे, असं रोहित पवार यांनी फोटो ट्विट करत म्हटलं आहे, असं म्हणत उदय सामंत यांची या विषयावरील प्रतिक्रिया पत्रकारांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावर उत्तर देताना उदय सामंत यांनी, “फोटो बघितल्यावर एक लक्षात येतं की एकनाथ शिंदे केवळ फोटोसाठी तिथे उभे होते,” असं म्हटलं आहे.

  • 6/15

    तसेच उदय सामंत यांनी पुढे, “याच्या आगोदरचा एक प्रसंग मी आपल्याला सांगू इच्छितो,” असं म्हणत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शपथविधीच्या कार्यक्रमात शिंदे पहिल्या रांगेत होते याची आठवण करुनदिली. “राष्ट्रपतींचा शपथग्रहण सोहळा ज्या दिवशी झाला त्या दिवशी एकनाथ शिंदे हे पहिल्या रांगेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बाजूला होते. ते कोणाला दिसलं नाही हे आपलं दुर्दैव आहे,” असं उदय सामंत म्हणाले.

  • 7/15

    “कुठं तरी राजकारणासाठी राजकारण करण्यात अर्थ नाही. महाराष्ट्राचा मान-सन्मान दिल्लीमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने नक्की वाढलेला आहे. त्याची प्रचिती ओबीसी आरक्षणापासून अनेक गोष्टींमधून आलीय. शिंदेंचा अपमान केलाय असं मला तरी वाटत नाही,” असं उदय समांत यांनी म्हटलंय.

TOPICS
एकनाथ शिंदेEknath Shindeनरेंद्र मोदीNarendra ModiशिवसेनाShiv Sena

Web Title: Viral posts eknath shinde stand in last row during photo of niti aayog meet scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.