• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. congress leaders pays homage to late prime minister rajiv gandhi on 78th anniversary at virbhumi delhi gallery rvs

दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आज ७८ वी जयंती, काँग्रेस नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

काँग्रेस नेत्यांकडून दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना श्रद्धांजली अर्पण

August 20, 2022 16:44 IST
Follow Us
  • राजीव गांधी देशाचे सहावे पंतप्रधान होते. १९८४ ते १९८९ या काळात त्यांनी देशाचं पंतप्रधानपद भुषवलं. वयाच्या अवघ्या ४० व्या वर्षी ते देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान बनले.
    1/11

    राजीव गांधी देशाचे सहावे पंतप्रधान होते. १९८४ ते १९८९ या काळात त्यांनी देशाचं पंतप्रधानपद भुषवलं. वयाच्या अवघ्या ४० व्या वर्षी ते देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान बनले.

  • 2/11

    राजीव गांधी यांचा जन्म २० ऑगस्ट १९४४ रोजी मुंबईत झाला. इंग्लडमध्ये शिक्षण घेतल्यानंतर ते भारतात परतले. सरकारी मालकीच्या ‘इंडियन एअरलाईन्स’मध्ये त्यांनी पायलट म्हणून काम केलं.

  • 3/11

    (स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावर देशाला संबोधित करताना राजीव गांधी) काँग्रेस नेते संजय गांधी यांचा विमान दुर्घटनेत मृत्यू झाल्यानंतर राजीव गांधींनी राजकारणात पाऊल ठेवलं.

  • 4/11

    (श्रीलंकेतील बौद्ध भिक्षू शिष्टमंडळाकडून राजीव गांधींना भगवान बुद्धाची प्रतिमा भेट) श्रीलंकेतील एलटीटीईच्या आत्मघाती हल्लेखोरांकडून २१ मे १९९१ रोजी राजीव गांधींची हत्या करण्यात आली.

  • 5/11

    मनुष्यबळ विकास मंत्रालयाची राजीव गांधी सरकारच्या काळात १९८५ मध्ये स्थापना करण्यात आली. उच्च शिक्षण आणि आधुनिकीकरणाच्या विस्तारासाठी या मंत्रालयाची निर्मिती करण्यात आली.

  • 6/11

    राजीव गांधी हे आधुनिक युगातील नेते होते. विविध मतप्रवाहांचा ते आदर करायचे. शेतीसह विविध क्षेत्रांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर व्हावा, हा त्यांचा आग्रह होता.

  • 7/11

    दिल्लीतील वीरभूमीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राजीव गांधींना श्रद्धांजली अर्पण केली.

  • 8/11

    काँग्रेस नेत्या प्रियांका गांधींकडून राजीव गांधींना अभिवादन. राजीव गांधींना १९९१ रोजी भारत सरकारकडून देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’ प्रदान करण्यात आला.

  • 9/11

    ज्येष्ठ काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांच्याकडून वीरभूमीमध्ये राजीव गांधींना श्रद्धांजली

  • 10/11

    ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांच्याकडून राजीव गांधींनी श्रद्धांजली अर्पण

  • 11/11

    दिल्लीच्या वीरभूमीतील श्रद्धांजली कार्यक्रमात राहुल गांधी, प्रियांका गांधी-वाड्रा, रॉबर्ट वार्डा आणि मल्लिकार्जून खर्गे उपस्थित होते.

TOPICS
काँग्रेसCongressप्रियांका गांधी वाड्राPriyankaGandhiराजीव गांधीRajiv Gandhi

Web Title: Congress leaders pays homage to late prime minister rajiv gandhi on 78th anniversary at virbhumi delhi gallery rvs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.