• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. umred pauni karhandla wildlife sanctuary and tiger reserve surya tiger information photos nagpur bhandara sdn

Photos: चर्चेतला वाघ – ‘सूर्या : द बॉस’ शक्तीप्रदर्शन करून दहशत निर्माण करणारा वाघ

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातून तीन वर्षांपूर्वी उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यात येऊन स्वत:चे साम्राज्य निर्माण करणारा ‘सूर्या’हा वाघ त्यातलाच एक.

Updated: August 23, 2022 18:24 IST
Follow Us
  • Umred Pauni Karhandla Wildlife Surya Tiger Photos
    1/11

    शक्तीप्रदर्शन ही फक्त राजकीय नेत्यांचीच मक्तेदारी नाही बरं का! तर वाघदेखील हे शक्तीप्रदर्शन करुन त्याच्या क्षेत्रातून वाघांना हुसकावून लावत स्वत:चे साम्राज्य स्थापन करु शकतो.

  • 2/11

    ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातून तीन वर्षांपूर्वी उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यात येऊन स्वत:चे साम्राज्य निर्माण करणारा ‘सूर्या’हा वाघ त्यातलाच एक.

  • 3/11

    अतिशय शक्तीशाली, बलदंड अशा ‘सूर्या’ने उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यात येताच ‘टी-६’ व ‘टी-७’ या दोन वाघांना हुसकावून लावले होते.

  • 4/11

    ‘सूर्या’च्या दादागिरीने या दोघांनाही त्यांचा मूळ अधिवास सोडावा लागला आणि तेथे ‘सूर्या’चे जंगलराज सुरू झाले.

  • 5/11

    पाच ते सहा वर्षाच्या ‘सूर्या’च्या दहशतीमुळे उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यात दूसरा वाघ येण्याचे धाडस करत नाही.

  • 6/11

    कुही, उमरेड, कऱ्हांडला हे त्याचे भ्रमणक्षेत्र आहे. येथीलच ‘कॉलरवाली’ वाघिणीला ‘सी-२’ या वाघापासून तीन बछडे झाले होते. त्यांनाही ‘सूर्या’नेच मारल्याचे येथील कर्मचारी सांगतात.

  • 7/11

    ‘सुर्या’ आणि ‘कॉलरवाली’ नेहमी एकत्र फिरताना पर्यटकांना दिसायचे.

  • 8/11

    ‘फेअरी’सोबत देखील ‘सूर्या’ अनेकदा दिसतो. त्याच्यापासून पाच बछडे तिला झाले असून कित्येकदा पर्यटकांना या संपूर्ण कुटुंबाने दर्शन दिले आहे.

  • 9/11

    ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील ‘मटकासूर’ आणि ‘माया’ या वाघिणीचा तो मुलगा आहे.

  • 10/11

    सध्या त्याचा मुक्काम गोठणगाव, पवनी परिसरात आहे. आईपासून विभक्त झाल्यानंतर २०१९ मध्ये तो उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यातील गोठणगाव परिसरात स्थलांतरीत झाला होता.

  • 11/11

    छायाचित्रे – गजेंद्र बावणे, उपायुक्त, अमरावती विभाग (हेही पाहा : चर्चेतला वाघ – मॉडेलसारखे वेगवेगळे हावभाव देणारी ‘अभिव्यक्ती’ वाघीण)

TOPICS
नागपूरNagpurमहाराष्ट्रMaharashtraवाघTiger

Web Title: Umred pauni karhandla wildlife sanctuary and tiger reserve surya tiger information photos nagpur bhandara sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.