Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. maharashtra tadoba andheri reserve magnificent dadhiyal tiger with beard information nagpur tiger images sdn

Photos: चर्चेतला वाघ – दाढी असणारा शिरखेडाचा ‘दढियल’ वाघ

शिरखेडाचा ‘मास्टर ब्लास्टर’ अशीही त्याची ओळख आहे. तीक्ष्ण नजर, रुबाबदार चालणे पर्यटकांना खिळवून ठेवते.

September 13, 2022 16:02 IST
Follow Us
  • Dadhiyal Tiger Photos Information
    1/9

    ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील अनेक वाघांनी त्यांचा स्वत:चा अधिवास आणि त्या अधिवासात त्यांची दहशत निर्माण केली आहे. ‘दढियल’ हा वाघ त्यातलाच एक. त्याच्या नावाचा महिमा देखील वेगळाच.

  • 2/9

    वाघांना दाढी असते..? असा प्रश्न केला तर कदाचित तुमच्याआमच्यासारखे सामान्य पर्यटक किंवा नागरिक त्याचे उत्तर देऊ शकणार नाहीत, पण वन्यजीव छायाचित्रकार त्याचे उत्तर नक्कीच देऊ शकतील.

  • 3/9

    या वाघाकडे पाहिल्यानंतर पहिल्यांदा लक्ष जाते ते ठसठशीतपणे दिसणाऱ्या त्याच्या दाढीकडे आणि म्हणूनच कदाचित त्याला ‘दढियल’ हे नाव पडले असावे.

  • 4/9

    ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील शिरखेडा बफरचा तो राजा.

  • 5/9

    या क्षेत्रात वाघाची संख्या फारशी नव्हती, पण ‘दढियल’ने त्याचे साम्राज्य प्रस्थापित करतानाच त्याची वंशावळ तयार केली. या परिसरात वाघांच्या संख्येत वाढ करणारा तो ज्येष्ठ वाघ.

  • 6/9

    वाघांची संख्या कमी होत असताना तो वरदान म्हणून समोर आला. त्याला पाहिल्यानंतरच त्याचे सामर्थ्य लक्षात येते.

  • 7/9

    शिरखेडाचा ‘मास्टर ब्लास्टर’ अशीही त्याची ओळख आहे. तीक्ष्ण नजर, रुबाबदार चालणे पर्यटकांना खिळवून ठेवते. अनेकदा तो त्याच्या संपूर्ण कुटुंबासह दर्शन देतो.

  • 8/9

    शिरखेडा बफर क्षेत्रावर एकहाती सत्ता गाजवणारा ‘दढियल’ आता पांगडी बफर क्षेत्रात दिसून येतो.

  • 9/9

    सर्व छायाचित्रे – गजेंद्र बावणे, उपायुक्त, अमरावती (हेही पाहा : ताडोबातील ४० वाघांचा बाप ‘बिग डॅडी’)

TOPICS
नागपूरNagpurमहाराष्ट्रMaharashtraवाघTiger

Web Title: Maharashtra tadoba andheri reserve magnificent dadhiyal tiger with beard information nagpur tiger images sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.