-
बीड जिल्ह्यातील सावरगाव येथे भाजपा नेते आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा पार पडला आहे.
-
दसरा मेळाव्यात केलेल्या भाषणातून पंकजा मुंडे यांनी विविध राजकीय चर्चांवर आपली भूमिका मांडली असून २०२४ ला निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत.
-
हा चिखल फेकणाऱ्यांचा नाही, तर चिखल तुडवणाऱ्यांचा मेळावा आहे. चिखल तुडवणं, संघर्ष करणं हे आमच्या रक्तात आहे.
-
जे गोपीनाथ मुंडेंची विरोधक होते, ज्यांनी मला विरोध केला, पातळी सोडून माझ्यावर टीका केली. – पंकजा मुंडे
-
“हकीकत को तलाश करना पडता हैं, अफवा तो घर बैठे बैठे मिल जाती हैं”. इथं जमलेले लोक ही ‘हकीकत’ आहे, माझी शक्ती आहे. माझ्याकडे तुम्हाला बसायला द्यायला खुर्च्या नव्हत्या, तुमची व्यवस्था करण्याची माझी ऐपत नाही – पंकजा मुंडे
-
तुम्ही दाटीवाटीने इथं बसला आहात. खुर्च्या लावल्या असत्या तर हा मेळावा किती मोठा झाला असता. तुम्ही जमिनीवर बसणं गोड मानलं, मी तुमचे आभार मानते – पंकजा मुंडे
-
प्रीतम मुंडेंनी सांगितलं की, संघर्ष करो ही घोषणा बंद करा. कुणाला आयुष्यात संघर्ष आला नाही. संघर्षाशिवाय नाव होत नाही. कुणाचे जोडे उचलणाऱ्यांचं कधीच इतिहासाच नाव झालेलं नाही – पंकजा मुंडे
-
माझ्या अंगात हिंदवी स्वराज्याचं स्वप्न बघणाऱ्या छत्रपती शिवरायांचे संस्कार, भगवान बाबा आणि गोपीनाथ मुंडे यांचं रक्त आहे. मी संघर्षाला घाबरत नाही. मी थकणार नाही, कधीही कुणासमोर झुकणार नाही – पंकजा मुंडे
-
गोपीनाथ मुंडेंना संघर्ष नव्हता का? त्यांच्या वाट्याला कायम संघर्ष आला. त्याकाळात प्रवाहाविरोधात ज्या पक्षात कुणीच जात नव्हतं त्या पक्षात गोपीनाथ मुंडे कमळाचं फुल हातात घेऊन आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत लढले. – पंकजा मुंडे
-
गोपीनाथ मुंडेंनी ४० वर्षांच्या राजकारणात घालवली, पण केवळ साडेचार वर्षे सत्ता मिळाली. हा संघर्ष कमी आहे का? त्या गोपीनाथ मुंडेंचा संघर्ष आपल्यासमोर आहे – पंकजा मुंडे
-
माझ्या नाराजीची चर्चा बंद करा, कोणीही नाराज नाही. कुणाचीही अवहेलना करू नका, कुणाचा अपमान करू नका. ही माझी इच्छा आहे. इतके दिवस मी कधीच यावर बोलले नाही. मौन बाळगलं. कारण माझा तसा स्वभाव नाही. – पंकजा मुंडे
-
मला गर्व नाही, मला स्वाभिमान आहे. माझ्या लेखी नाराजीचा विषय संपला आहे. ज्यांना मंत्री करायचं ते करतील, आपण २०२४ च्या तयारीला लागलं पाहिजे – पंकजा मुंडे
-
तुमचं माझ्यावर प्रेम आहे, श्रद्धा आहे, आस्था आहे, निष्ठा आहे, माझ्यावर विश्वास आहे, तर मला शोभेल असं वागा. पक्षाने तिकीट दिलं तर मी २०२४ च्या तयारीला लागणार आहे. माझं असंच आहे – पंकजा मुंडे
-
“जरुरत से जादा इमानदार हू मैं, इसलिए सबके नजरों में गुनहगार हु”. मला आता पक्षाला त्रास द्यायचा नाही. कोणत्याही नेत्याबद्दल काही बोलायचं नाही. – पंकजा मुंडे
-
आपण आपलं शांत राहायचं. मी दुर्गेचं रुप धारण करावं असं तुम्हाला वाटतं, ते मी करेन – पंकजा मुंडे
-
मी पदर पसरून कुणाकडे काही मागायला जाणार नाही. त्यामुळे सर्वांनी आपआपल्या मतदारसंघात जावं आणि आपली वज्रमुठ आवळा –पंकजा मुंडे
-
“जितना बदल सकते थे खुद को बदल दिया हमने, अब जिनको शिकायत है वह खुद को बदले” असं माझं सांगणं आहे. – पंकजा मुंडे
-
आता विषय संपला, आपण आपलं काम करुया. तुम्ही कुणीही पदाची अपेक्षा करायची नाही. माध्यमांनीही चर्चा करायची नाही – पंकजा मुंडे
“….तर मी दुर्गेचं रुप धारण करेन”, पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
बीड जिल्ह्यातील सावरगाव येथे भाजपा नेते आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा पार पडला आहे.
Web Title: Bjp leader pankaja munde dasara melava at savargaon beed live speech points rmm