-
सोमवारी सायंकाळी पुण्यात तुफान पाऊस झाला. या पावसात अनेक दुचाकी वाहून गेल्या तर चारचाकी गाड्या अडकून पडल्या. (सर्व फोटो : अरुल होरायझन/ इंडियन एक्सप्रेस)
-
कोंडाव्यातील एनआयएमबी अॅनेक्स परिसरामध्ये अशीच एक आलिशान गाडी पावसाच्या पाण्यात अडकली.
-
पावसामुळे साचलेल्या पाण्यात अडकलेली ही गाडी बीएमडब्ल्यू कंपनीची होती.
-
बीएमडब्लू फाइव्ह सिरीजच्या या गाडीला पाण्यातून बाहेर काढण्याआधीच ती अर्ध्याहून अधिक पाण्यात बुडाली होती.
-
अखेर या गाडीच्या चालकाने रेस करुन गाडी पाण्यातून काढण्याऐवजी इतरांची मदत घेण्याचा निर्णय घेतला.
-
व्हीबग्योअर शाळेजवळच्या खोलगट भागातील रस्त्यावर अडकलेली ही गाडी बाहेर काढण्यासाठी काही रिक्षावाले आणि इतर चारचाकी मालक समोर आले.
-
पाण्यामध्ये बुडालेली ही आलिशान गाडी दोरखंडाच्या मदतीने बाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आला.
-
काही अंतरावर उभ्या असणाऱ्या गाडीच्या पुढील भागाला दोरखंडाचं एक टोक बांधण्यात आलं.
-
दुसरं टोक या बुडालेल्या बीएमडब्ल्यूला बांधण्यात आलं आणि ती बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरु झाला.
-
बारच वेळ हा प्रयत्न सुरु होता.
-
एक दोन वेळा दोर व्यवस्थित जागेवर आणून पुन्हा पुन्हा प्रयत्न केल्यानंतर ही गाडी किमान चालू शकेल अशा पाणी पातळीजवळ आली आणि मग बाहेर निघाली.
-
बीएमडब्लू फाइव्ह सिरीजच्या या महागड्या गाड्यांची किंमत भारतामध्ये किमान ६५ लाखांपासून सुरु होते. (सर्व फोटो : अरुल होरायझन/ इंडियन एक्सप्रेस)
Pune Rain Photos: पुराच्या पाण्यात अडकलेली ६५ लाखांची BMW, रिक्षावाला अन् एक दोरखंड… ‘हे’ अनोखं मदतकार्य चर्चेत
Pune Rain Photos गाडी बाहेर काढण्याचे बरेच प्रयत्न चालकाने केले पण ते सर्व व्यर्थ गेले
Web Title: Pune rain photos bmw 5 series car held on a submerged road near vibgyor school at nibm annex scsg