-
आपल्या गाडीला कितीही वर्ष झाली तरी नव्यासारखंच दिसावं यासाठी प्रत्येजण प्रयत्न करतात.
-
जर तुम्हाला तुमच्या कारचा रंग फिका पडू नये, असं वाटत असेल तर तुम्हाला कार धुताना विशेष काळजी घ्यावी लागेल.
-
कार धुण्यासाठी कधीही डिटर्जंट वापरू नका. कार धुण्यासाठी नेहमी कार वॉशर शॅम्पू वापरा. त्यामुळे कारचा रंग सुरक्षित राहण्यास मदत होते.
-
डिटर्जंटने सातत्याने कार धूत राहिल्यास कारच्या रंगाचं नुकसान होऊ शकतं.
-
कार धुल्यानंतर वॅक्सचा वापर करणं उत्तम ठरेल. ही एक अतिशय उपयुक्त क्रीम लेयर असते, जी कारच्या पेंटचं सूर्याच्या किरणांपासून संरक्षण करते.
-
गाडीचा आतील भाग स्वच्छ करण्यासाठी तुम्ही पाण्यामध्ये शाम्पू मिसळून मऊ कापडाने तो साफ करू शकता. त्यामुळे गाडीच्या आतील भागात कोणतेही नुकसान होणार नाही आणि गाडी पूर्णपणे स्वच्छ देखील होईल.
-
तसेच कार धुताना फक्त मऊ वॉशिंग फोम वापरा, किंवा सुती कापड वापरलं तरी चालेल. रफ कापड वापरल्यास रंगाचं नुकसान होण्याची शक्यता असते.
-
गाडीची सफाई करताना गाडीचे टायर साफ करण्यासाठी मोठ्या लाँड्री ब्रशचा वापर करावा. त्यामुळे टायरच्या चरांमध्ये भरलेली माती अगदी सहजपणे काढली जाते आणि त्यामुळे कारचे टायर नव्या सारखे दिसायला लागतील.
-
कारच्या कार्पेटची साफसफाई करण्यासाठी कार्पेट काढून ते व्हॅक्युम क्लिनर किंवा एअर कॉम्प्रेसरच्या मदतीने स्वच्छ करावे.
-
पावसाळ्यात आणि थंडीच्या वातावरणातही गाडीची काळजी घ्यावी.
-
कार चमकवण्यासाठी तुम्ही कंडिशनर, पॉलिशिंग किंवा कोटिंग वापरू शकतात. या गोष्टींचा उपयोग केल्यामुळे तुमच्या गाडीला नुकसान देखील होणार नाही.
-
तुम्ही तुमची गाडी उन्हात कुठेही पार्क करू नये. (फोटो सौजन्य : pixabay)
Photos : दिवाळीत घरच नव्हे तर वाहनांनाही आणा चकाकी; फॉलो करा ‘या’ टिप्स!
दिवाळीची धामधूम सर्वत्र सुरु झाली आहे. अनेकजण आपल्या घराला स्वच्छ करायला लागली आहेत. घराप्रमाणेच अनेकजण आपलं वाहनही स्वच्छ करायला लागली आहेत. आपल्या गाडीला कितीही वर्ष झाली तरी नव्यासारखंच दिसावं यासाठी प्रत्येजण प्रयत्न करतात. वाहन स्वच्छ ठेवणे, वेळेवर वाहन धुणे अशा गोष्टी करून वाहन नव्यासारखं ठेवण्याचा प्रयत्न करतात. मात्र, असे प्रयत्न केले तरी काही वर्षांनी कारच्या…
Web Title: Use these tips to make your car shine like a house this diwali pdb