-
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीनं शिवाजी पार्कमध्ये आयोजित करण्यात आलेल्या दीपोत्सवाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं.
-
या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला एकनाथ शिंदेेंबरोबरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एकाच मंचावर दिसून आले.
-
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीनं शिवाजी पार्कमध्ये आयोजित करण्यात आलेल्या दीपोत्सवामध्ये पहिल्यांदाच हे तिन्ही नेते एकत्र दिसून आले.
-
राज हे त्यांचा नातू किआनला घेऊन अनेक वेळा दिसले.
-
अगदी उद्घाटनाच्या प्रसंगीसुद्धा राज हे किआनला कडेवर घेऊन उभे होते.
-
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही किआनबरोबरचा फोटो शेअर केला आहे.
-
या उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर राज ठाकरेंनी आपल्या नातवासोबत गाडीमधून रोषणाई पाहण्यासाठी शिवाजी पार्कचा फेरफटका मारला.
-
राज आजोबा आणि त्यांच्या नातवाचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.
-
या फोटोंमध्ये राज यांचे पुत्र अमित ठाकरे हे गाडीच्या बॅक सीटवर बसल्याचं दिसत आहे.
-
रोषणाई दाखवण्यासाठी अमित यांनी किआनला पुढच्या दोन सीटच्या मध्यभागी असणाऱ्या जागेत उचलून धरल्याचं दिसत आहे.
-
राज ठाकरे किआनला रोषणाई दाखवत असल्याचं फोटोंमध्ये दिसत आहे.
-
मनसेशी संलग्न अनेक अकाऊंटवरुन हे फोटो शेअर करण्यात आले आहेत.
-
याच वर्षी पाच एप्रिल रोजी अमित ठाकरे आणि मिताली यांना पुत्ररत्नप्राप्ती झाली.
-
नातू झाल्याची बातमी समजल्यानंतर राज ठाकरे ब्रीच कॅण्डी रुग्णालयामध्ये नातवाला पाहण्यासाठी गेल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या.
-
राज ठाकरे अनेकदा आपल्या नातवाचे लाड करतानाचे क्षण कॅमेरात कैद झाले आहेत.
-
काही दिवसांपूर्वीच राज हे किआनला शिवाजी पार्कचा फेरफटका मारण्यासाठी घेऊन गेले होते. ते किआनसोबत बराच वेळ शिवाजी पार्कच्या कठड्यावर बसून होते. किआनला पाहण्यासाठी अनेकांनी राज यांच्याभोवती गर्दी केली.
-
राज यांची सून मिताली तसेच पत्नी म्हणजेच बाळाच्या आजी शर्मिला ठाकरेही या दोघांबरोबर होत्या.
-
राज यांचा हा आजोबांचा रोलही मनसेच्या कार्यकर्त्यांना फारच भावल्याचं सोशल मीडियावरील कमेंट्सवरुन दिसत आहे.
Photos: मनसेच्या दिपोत्सवातील ‘गोंडस होस्ट’! फडणवीसांनीही केले लाड नंतर राज आजोबांसोबत रोषणाई पाहण्यासाठी लाँग ड्राइव्ह
मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस अन् मनसे अध्यक्ष राज ठाकरेंबरोबरच या चिमुकल्याचीही सोशल मीडियावर चांगलीच चर्चा
Web Title: Raj thackeray car drive with grandson kian amit thakceray after mns shivaji park deepotsav ignoration by cm eknath shinde dcm devendra fadnavis scsg