Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. bjp leader nitin gadkari loves mumbai street food said it is best in the world photos kak

Photos: नितीन गडकरी म्हणतात स्ट्रीट फूडच्या बाबतीत मुंबई जगात भारी! म्हणाले, “सुरक्षारक्षकांना घरी पाठवून…”

नितीन गडकरींनी मुलाखतीत मुंबईतील स्ट्रीट फूडचा एक किस्साही सांगितला.

Updated: November 5, 2022 18:07 IST
Follow Us
  • nitin gadakari loves mumbai street food says it is best in world
    1/15

    भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ‘इंडिया टुडे कॉनक्लेव्ह’मध्ये हजेरी लावली.

  • 2/15

    या कार्यक्रमातील मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी दिलखुलासपणे उत्तरं दिली.

  • 3/15

    नितीन गडकरींनी मुलाखतीत मुंबईतील स्ट्रीट फूडबद्दलचा किस्साही सांगितला.

  • 4/15

    गडकरी हे खवय्ये आहेत. याआधीही अनेक मुलाखतींमधून त्यांनी मुंबई आणि तेथील रस्त्यांवर मिळणाऱ्या स्ट्रीट फूडबद्दल असलेलं त्यांचं प्रेम व्यक्त केलं आहे.

  • 5/15

    ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीतही पुन्हा एकदा त्यांनी मुंबईतील खाद्यपदार्थांबद्दल भाष्य केलं.

  • 6/15

    ते म्हणाले, “मुंबईत चांगले खाद्य पदार्थ हे रस्त्यावरच मिळतात. मुंबईसारखं स्ट्रीट फूड संपूर्ण जगात कुठेच मिळत नाही. मुंबईतील स्ट्रीट फूडचा दर्जाही उत्तम आहे”.

  • 7/15

    यावेळी मित्रांबरोबरचा एक किस्साही नितीन गडकरी यांनी सांगितला.

  • 8/15

    “माझ्याबरोबर झेड प्लस सिक्युरीटी असते. ५० पोलिसांबरोबर फुटपाथवर गेलो तर ते रस्ता बंद करतील”, असं त्यांनी सांगितलं.

  • 9/15

    पुढे ते म्हणाले, “त्यामुळे झोपायला जात आहे असं सांगून माझ्या सुरक्षारंक्षकांना मी घरी पाठवतो. त्यानंतर मी माझ्या मित्रांबरोबर मुंबईतील फुटपाथवरील पदार्थांचा आस्वाद घेतो”.

  • 10/15

    मुंबईत आल्यानंतर गडकरी त्यांच्या नेहमीच्या ठरलेल्या जागीच जेवण करतात.

  • 11/15

    मुलाखतीदरम्यान याबद्दलही त्यांना प्रश्न विचारण्यात आला.

  • 12/15

    तेव्हा त्यांनी “हो हे खरं आहे. पण मी ठिकाणाचं नाव सांगणार नाही”, असं मजेशीर उत्तर दिलं.

  • 13/15

    यावरुन नितीन गडकरींना मुंबईतील स्ट्रीट फूड किती आवडतं, हे दिसून येते.

  • 14/15

    (सर्व फोटो : नितीन गडकरी/ फेसबुक)

  • 15/15

    (हेही पाहा >> Photos : “दहा वर्षांचा बॅकलॉग…”; महेश मांजरेकरांचा चित्रपट पण चर्चा मात्र राज ठाकरे-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेटीची)

TOPICS
नितीन गडकरीNitin GadkariफूडFoodभारतीय जनता पार्टीBJP

Web Title: Bjp leader nitin gadkari loves mumbai street food said it is best in the world photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.