-
शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर आगामी सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, असं सर्वांना वाटत होतं.
-
मात्र, शेवटच्या क्षणी एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रीपद देण्यात आलं, तर देवेंद्र फडणवीसांकडे उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिली.
-
उपमुख्यमंत्रीपद मिळणं हा माझ्यासाठी धक्का होता, असं विधान देवेंद्र फडणवीसांनी केलं आहे. ते ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
-
यावेळ फडणवीस म्हणाले की, सत्तांतर घडत असताना सर्व घडामोडी क्रिकेटच्या टी-२० सामन्याप्रमाणे घडत गेल्या.
-
एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय माझ्या सहमतीने झाला.
-
एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव माझाच होता, असं वक्तव्य फडणवीसांनी केलं आहे.
-
एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करावं, असा प्रस्ताव मी दिल्यानंतर आमच्या वरिष्ठ नेत्यांनी याला मान्यता दिली. त्यामुळे एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करणं, हा माझ्यासाठी धक्का नव्हता.
-
पण मी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारावी, हा निर्णय माझ्यासाठी धक्का होता. आमच्या वरिष्ठ नेत्यांनी जेव्हा माझ्याशी चर्चा केली, तेव्हा ते या निर्णयावर ठाम होते.
-
जेव्हा मी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत होतो, तेव्हा माझ्या मनात विविध प्रकारचे विचार सुरू होते. ते चेहऱ्यावरही स्पष्टपणे दिसत होते, ही बाब मी लपवणार नाही.
-
या निर्णयानंतर महाराष्ट्र आणि देशातून मला प्रचंड पाठिंबा मिळाला, असंही फडणवीस म्हणाले.
-
मुख्यमंत्री बनून माझं कर्तृत्व जेवढं वाढलं असतं, तेवढंच उपमुख्यमंत्री बनून माझं कर्तृत्व वाढलं.
-
जेव्हा तुम्ही असं परिवर्तन करत असता, तेव्हा तुम्हाला असे कठोर निर्णय घ्यावे लागतात. तेव्हा घेतलेल्या निर्णयावर आता पूर्णपणे समाधानी आहे, असंही फडणवीस म्हणाले.
“होय, उपमुख्यमंत्रीपद मिळणं माझ्यासाठी धक्का होता” फडणवीसांनी दिली कबुली, म्हणाले…
एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव माझाच होता, असं वक्तव्य फडणवीसांनी केलं आहे.
Web Title: Offering duputy chief minister post was shock for me said devendra fadnavis rmm