Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. apple first retail store opening mumbai bandra kurla complex ceo tim cook welcomes customers india photos sdn

Photos: टीम कूक यांच्या उपस्थितीत मुंबईत भारतातील पहिल्या ‘ब्रॅण्ड स्टोअर’चं उद्घाटन, वाचा दालनाची खास वैशिष्ट्ये…

वांद्रे-कुर्ला वाणिज्य संकुलातील एका आलिशान जागेत उभारण्यात आलेल्या या भव्य दालनामध्ये मुंबई आणि भारतीय संस्कृतीचे मिश्रण असलेल्या आकर्षक रचनेसह अ‍ॅपलच्या सर्व उत्पादनांचा अनुभव घेता येणार आहे.

April 18, 2023 13:44 IST
Follow Us
  • Apple First Retail Store in BKC Mumbai India
    1/18

    Apple First Retail Store Opening: भारतीय स्मार्टफोन बाजारपेठेचा तीन टक्के हिस्सा असलेल्या आयफोन निर्मात्या अ‍ॅपलचे देशातील पहिलेवहिले ब्रॅण्ड स्टोअर मंगळवारपासून मुंबईत सुरू झाले. (Express Photo: Pradip Das)

  • 2/18

    वांद्रे-कुर्ला वाणिज्य संकुलातील एका आलिशान जागेत उभारण्यात आलेल्या या भव्य दालनामध्ये मुंबई आणि भारतीय संस्कृतीचे मिश्रण असलेल्या आकर्षक रचनेसह अ‍ॅपलच्या सर्व उत्पादनांचा अनुभव घेता येणार आहे. (Express Photo: Pradip Das)

  • 3/18

    आयफोन, आयपॅड या दोन प्रमुख उत्पादनांसह अ‍ॅपल गेल्या २५ वर्षांपासून भारतीय बाजारात स्थिरावू पाहात आहे. (Express Photo: Pradip Das)

  • 4/18

    त्यातही गेल्या दशकभरात आयफोनला भारतीय ग्राहकांकडून अधिक पसंती मिळाली आहे. (Express Photo: Pradip Das)

  • 5/18

    गत आर्थिक वर्षात भारतातून होणारी आयफोन निर्यात पाच अब्ज डॉलरवर गेली आहे. (Express Photo: Pradip Das)

  • 6/18

    या पार्श्वभूमीवर मुंबई आणि दिल्लीत अ‍ॅपल स्टोअर सुरू होत आहेत. (Express Photo: Pradip Das)

  • 7/18

    त्यातील पहिले दालन मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील २० हजार चौरस फूट क्षेत्रफळाच्या जागेवर मंगळवारपासून सुरू होत आहे. (ANI Photo)

  • 8/18

    जगभरातील अ‍ॅपल स्टोअरसारखीच रचना असलेल्या या दालनाला ‘मुंबई’ स्पर्श देण्याचा प्रयत्न सजावटीतून करणायत आला आहे. (Express Photo: Pradip Das)

  • 9/18

    ग्राहकांना या दालनात येऊन अ‍ॅपलची सर्व उत्पादने हाताळता येणार आहेत. (Image Credit: Anuj Bhatia/Indian Express)

  • 10/18

    तसेच पुढील काही दिवस या ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून येथे ग्राहकांना वॉलपेपर, म्युझिक प्ले लिस्ट डाऊनलोड करता येणार आहेत. (Express Photo: Pradip Das)

  • 11/18

    मुंबईतील दालनाच्या उद्घाटनाला अ‍ॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कूक उपस्थित होते. (Tim Cook/Twitter)

  • 12/18

    स्टोअर सुरु होण्याआधीच अ‍ॅपलच्या चाहत्यांनी त्या स्टोअरसमोर गर्दी केली होती. (ANI Photo)

  • 13/18

    सकाळी ६ वाजल्यापासून अनेक लोक तिथे रांगेत उभे राहिले होते. (ANI Photo)

  • 14/18

    अ‍ॅपलचे स्टोअर आज सकाळी ११ वाजता लोकांसाठी सुरू करण्यात आले आहे. (Image Credit: Anuj Bhatia/Indian Express)

  • 15/18

    टीम कूक यांनी वांद्रे-कुर्ला संकुलातील दालनांत १०० हून अधिक कर्मचाऱ्यांसह छायाचित्र टि्वट करुन, त्यांचे भारतात आगमन झाल्याची आणि मंगळवारी हे दालन जेव्हा ग्राहतांसाठी खुले होईल, तेव्हा ते स्वागतासाठी जातीने उपस्थित असतील, याची पुष्टी केली. (Tim Cook/Twitter)

  • 16/18

    सोमवारी टीम कूक यांनी अभिनेत्री माधुरी दिक्षितसह ‘वडापाव’चा आस्वाद घेतला. (Tim Cook/Twitter)

  • 17/18

    मुकेश अंबानी आणि टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांचीही भेट घेतल्याचे सांगण्यात आले. (Express Photo: Pradip Das)

  • 18/18

    या भारत दौऱ्यात टीम कूक हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीदेखील भेट घेतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. (Express Photo: Pradip Das)

TOPICS
तंत्रज्ञानTechnologyमहाराष्ट्रMaharashtraमाहिती तंत्रज्ञानInformation Technologyमुंबई न्यूजMumbai News

Web Title: Apple first retail store opening mumbai bandra kurla complex ceo tim cook welcomes customers india photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.