• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • दिवाळी २०२५
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. uddhav thackeray says take barsu refinery to gujarat and vedanta foxconn project to maharashtra asc

“ही रिफायनरी गुजरातला न्या आणि…”, बारसूत उद्धव ठाकरे आक्रमक; म्हणाले, “गद्दारांनी मला सांगितलं…”

उद्धव ठाकरे यांनी आज बारसू येथे जाऊन रिफायनरीला विरोध करणाऱ्या ग्रामस्थांची भेट घेतली.

May 6, 2023 17:45 IST
Follow Us
  • Uddhav Thackeray at Barsu (1)
    1/9

    बारसूमध्ये प्रकल्प झाला तर फायदा होईल असं मला गद्दारांनी सांगितलं होतं. आम्ही जेव्हा नाणारला विरोध केला आणि नाणारमध्ये हा प्रकल्प होणार नाही हे ठरलं तेव्हा या गोष्टी घडल्या होत्या. मात्र आता प्रकल्प आणा किंवा आणू नका या सरकारच्या खुर्चीचे पाय मला डगमगताना दिसत आहेत असं म्हणत बारसू प्रकल्पावरून उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे सरकार आणि भाजपावर जोरदार टीका केली आहे.

  • 2/9

    बारसू या ठिकाणी उद्धव ठाकरे आज (६ मे) आले होते. तिथल्या कातळ शिल्पांची पाहणीही त्यांनी केली. तसंच पत्रकार परिषद घेऊन शिंदे सरकारवर घणाघाती टीका केली.

  • 3/9

    उद्धव ठाकरे म्हणाले, आज बारसूच्या प्रकल्पासाठी माझं पत्र नाचवत आहात मग वेदांता फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क, एअरबस यांसारखे प्रकल्प गुजरातला का गेले? ते पण माझ्या कारकिर्दीतच येत होते ते तिकडे का जाऊ दिले?

  • 4/9

    उद्धव ठाकरे म्हणाले, आज तुम्हाला सांगतो ही रिफायनरी गुजरातला न्या आणि तिथला वेदांता फॉक्सकॉन किंवा इतर प्रकल्प ज्यांच्यावरुन वाद नाहीत ते महाराष्ट्रात आणा. गिफ्ट सिटी गुजरातला का गेली? चांगल्या गोष्टी दिल्ली आणि गुजरातला न्यायचे आणि विनाशकारी प्रकल्प लादायचे याला काय म्हणायचं?

  • 5/9

    उद्धव ठाकरे म्हणाले, मला या सरकारच्या खुर्चीचे पाय डगमगताना दिसत आहेत. मी प्रकल्पाला विरोध करण्याची भूमिका घेतली असली तरीही सरकारकडून एकही पाऊल मागे घेतलं जात नाहीये. पण त्यांच्या खुर्चीचे पाय डगमगत आहेत. हे सरकार लवकरच पडेल.

  • 6/9

    सत्ताधारी उद्धव ठाकरेंवर टीका करताना म्हणत असतात की, सगळ्या गोष्टींना यांची नकारघंटा असते. त्यावर उद्धव ठाकरे यांनी यावेळी उत्तर दिलं.

  • 7/9

    उद्धव ठाकरे म्हणाले, माझी सगळ्या गोष्टींना नकारघंटा असती तर समृद्धी महामार्ग झाला असता का? इतकंच नाही तर जेव्हा सगळे चांगले प्रकल्प गुजरातला जात होते तेव्हा हे शेपूट घालून का बसले होते?

  • 8/9

    प्रकल्प चांगला असता तर आम्ही विरोध कशाला करु? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला.

  • 9/9

    उद्धव ठाकरे म्हणाले, ज्या प्रकारची दडपशाही चालली आहे त्यामुळे यात काहीतरी काळंबेरं आहे असं दिसतं आहे. मी पत्र दिलं होतं पण दडपशाही करुन प्रकल्प लादा म्हणून सांगितलं नव्हतं.

TOPICS
उद्धव ठाकरेUddhav Thackerayएकनाथ शिंदेEknath Shinde

Web Title: Uddhav thackeray says take barsu refinery to gujarat and vedanta foxconn project to maharashtra asc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.