-
एका इन्स्टाग्राम पोस्टमुळे अकोल्यात मध्यरात्री दंगल उसळली होती. पोलिसांनी बळाचा वापर करून परिस्थिती आटोक्यात आणली खरी, परंतु या दंगलखोरांनी जुन्या शहर भागात अनेक ठिकाणी दगडफेक आणि जाळपोळ केली आहे. (PC : ANI)
-
या दंगलीत आतापर्यंत १० दंगलखोर आणि दोन पोलीस जखमी झाले आहेत. (PC : ANI)
-
जुन्या शहरातील हरिहरपेठमध्ये मध्यरात्री दोन गटांमध्ये मोठा राडा झाला. या राड्यात अनेक वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली आहे. (PC : ANI)
-
दंगलखोरांनी अनेक दुचाकी, चारचाकी वाहनं पेटवली. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी अग्निशमन दलाच्या वाहनांची देखील तोडफोड केली आहे. (PC : ANI)
-
या दंगलीनंतर अकोला शहरातील अनेक भागांमध्ये कलम १४४ अंतर्गत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दंगलखोरांनी पोलीस ठाण्याबाहेरही दगडफेक केल्याची माहिती मिळाली आहे.(PC : ANI)
-
इन्स्टाग्रामवर एका व्यक्तीने वादग्रस्त पोस्ट शेअर केल्यामुळे आधी भांडण आणि दोन गटांमध्ये राडा झाला. त्यानंतर पोलीस या प्रकरणी गुन्हा दाखल करत होते. त्याचवेळी पोलीस ठाण्याबाहेर दगडफेक सुरू झाली. (PC : ANI)
-
गर्दी पांगवण्यासाठी पोलीस बाहेर पडले. तोवर दंगलखोरानी जाळपोळ सुरू केली होती. (PC : ANI)
-
त्यानंतर पोलिसांना परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी अधिक पोलीसफाटा मागवावा लागला. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. तसेच अश्रूधुराच्या नळकांड्या सोडाव्या लागल्या. (PC : ANI)
-
राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाने सांगितलं की, अकोल्यातील घटनेबाबत ते काल रात्रीपासून डीजीपी आणि अकोला पोलिसांच्या संपर्कात होते. आता परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून परिसरात शांतता आहे. आतापर्यंत सुमारे ३० आरोपींना अटक करण्यात आली असून घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. (PC : ANI)
-
अकोल्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे म्हणाले, रात्री शहरात जातीय तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असताना शहराच्या काही भागात अचानक दगडफेक सुरू झाली. दंगलखोरांनी वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ केली. त्यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रित आणण्याचा प्रयत्न केला. दंगलखोरांना रोखण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या सोडाव्या लागल्या. (PC : ANI)
Photos : इन्स्टाग्रामवरील वादग्रस्त पोस्ट, राडा आणि…, अकोल्यात मध्यरात्री नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर घटनाक्रम
Akola riots : अकोल्यात मध्यरात्री नेमकं काय घडलं, वाचा दंगलीचा सविस्तर आढावा.
Web Title: Akola riots violence arson in akola city after controversial social media post asc