• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • सरन्यायाधीश भूषण गवई
  • PM नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. force motors recently launched indias first 10 seater passenger car it has been named force citiline pdb

Gurkha-Thar सर्व विसरुन जाल? देशात दाखल झाली सर्वात स्वस्त १० सीटर कार, मोठ्या कुटुंबासाठी एकदम परफेक्ट

10 Seater Car in India: भारतीय बाजारात मोठ्या कुटुंबासाठी १० सीटर कार दाखल झाली आहे. किंमत…

Updated: May 26, 2023 10:09 IST
Follow Us
  • देशांतर्गत कार उत्पादक फोर्स मोटर्स (Force Motors) ने काही काळापूर्वी भारतातील पहिली १० सीटर पॅसेंजर कार लाँच केली होती.
    1/9

    देशांतर्गत कार उत्पादक फोर्स मोटर्स (Force Motors) ने काही काळापूर्वी भारतातील पहिली १० सीटर पॅसेंजर कार लाँच केली होती.

  • 2/9

    याला ‘Force Citiline’ असे नाव देण्यात आले आहे, जी कंपनीच्या फोर्स ट्रॅक्स क्रूझरची अद्ययावत आवृत्ती आहे. कुटुंब आणि मित्रांसह लांबच्या सहलींसाठी सिटीलाइन हा योग्य पर्याय असल्याचे, कंपनीचे म्हणणे आहे.

  • 3/9

    विशेष बाब म्हणजे, सर्व सीट्स फॉरवर्ड फेसिंग डिझाइनसह येतात, ज्यामुळे तुम्हाला टॅक्सी वाटणार नाही. खास गोष्ट म्हणजे लूकच्या बाबतीत ती कोणत्याही ऑफरोड एसयूव्हीपेक्षा कमी दिसणार नाही.

  • 4/9

    फोर्स सिटीलाईनमध्ये ड्रायव्हर व्यतिरिक्त ९ लोक बसू शकतात. साधारणपणे ७ सीटर कार ३ रांगांच्या असतात.

  • 5/9

    परंतु फोर्स सिटीलाईनमध्ये ४ लाईन देण्यात आल्या आहेत. यात पहिल्या रांगेत २ लोक, दुसऱ्या रांगेत ३ लोक, तिसऱ्या मध्ये २ लोक आणि चौथ्या मध्ये ३ लोक बसू शकतात.

  • 6/9

    फोर्स सिटीलाइन आकाराने खूप मोठी आहे. याची ५१२०mm लांबी, १८१८mm रुंदी, २०२७mm उंची आणि ३०५०mm व्हीलबेस आहे. त्याचे ग्राउंड क्लीयरन्स १९१ मिमी आहे. या MUV ची पुढची रचना तुम्हाला टाटा सुमोची आठवण करून देईल.

  • 7/9

    Citiline २.६-लिटर डिझेल इंजिनसह येते जे ९१ अश्वशक्ती आणि २५० Nm पीक टॉर्क निर्माण करते. यात ६३.५ लीटरची इंधन टाकी, ५-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि ३१४० किलो वजन आहे.

  • 8/9

    यात शक्तिशाली ड्युअल एअर कंडिशनिंग, सेंट्रल लॉकिंग पॉवर विंडो, मल्टिपल यूएसबी चार्जिंग पोर्ट्स, मागील पार्किंग सेन्सर्स, बॉटल होल्डर आणि सामानासाठी फोल्डिंग-प्रकारच्या शेवटच्या-रो सीट्स यांसारखी अनेक उत्कृष्ट वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

  • 9/9

    प्रवासी आरामात वाहनात प्रवेश करू शकतात आणि बाहेर पडू शकतात. या कारची सुरुवातीची किंमत १६.५ लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. (फोटो सौजन्य- citiline.forcemotors.com )

TOPICS
ऑटोAutoऑटो न्यूजAuto Newsट्रेंडिंग न्यूजTrending News

Web Title: Force motors recently launched indias first 10 seater passenger car it has been named force citiline pdb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.