• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. ncp chief sharad pawar pratibha pawar 57th happy wedding anniversary supriya sule shared photos love story sdn

Love Story: शरद पवार आणि प्रतिभाईताईंच्या लग्नाची ५६ वर्षे, सुप्रिया सुळेंनी फोटो पोस्ट करत दिला आठवणींना उजाळा

शरद पवारांचे मोठे बंधू माधवराव व अरविंद राणे यांची घट्ट मैत्री होती.

Updated: August 1, 2023 14:07 IST
Follow Us
  • NCP Sharad Pawar Pratibha Pawar Love Story
    1/21

    राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांच्या लग्नाचा आज ५६ वा वाढदिवस आहे.

  • 2/21

    १ ऑगस्ट १९६७ रोजी शरद पवार यांनी प्रतिभा पवार यांच्यासह लग्नगाठ बांधली.

  • 3/21

    शरद पवार यांची मुलगी खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत आई-बाबांना शुभेच्छा दिल्या आहेत.

  • 4/21

    शरद पवार यांच्या यशस्वी कराकिर्दीत त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांचा मोठा वाटा आहे.

  • 5/21

    १९६७ साली आमदारकी मिळाल्यानंतर त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांचे स्थळ त्यांच्यासाठी चालून आले होते.

  • 6/21

    शरद पवारांचे मोठे बंधू माधवराव व अरविंद राणे यांची घट्ट मैत्री होती.

  • 7/21

    इंग्लंडमध्ये ते एकत्र शिकत होते. या अरविंद राणेंना शरद पवार व त्यांची भावंडे ‘इंग्लिश मामा’ म्हणत असत असे.

  • 8/21

    भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व केलेले सदाशिव शिंदे हे अरविंद राणे यांचे जावई होते.

  • 9/21

    शिवाजी पार्कवर सराव करत असताना सदाशिव शिंदे यांचं उष्माघाताने निधन झालं होतं.

  • 10/21

    त्यामुळे त्यांची पत्नी आपल्या चार मुलींसह अरविंद राणे यांच्याकडे राहायल्या आल्या होत्या.

  • 11/21

    त्यांच्याच चार मुलींपैकी एक कन्या म्हणजे प्रतिभा या होत्या.

  • 12/21

    अरविंद राणे यांनी प्रतिभा यांच्यासाठी शरद पवारांचं स्थळ सुचवलं होतं.

  • 13/21

    पण नुकतेच आमदार झालेले शरद पवार लग्न करण्यासाठी उत्सुक नव्हते.

  • 14/21

    त्यांच्या आई त्यांना स्थळ पाहण्यासाठी घेऊन गेल्या होत्या.

  • 15/21

    मुलगी बघायला शरद पवार आईच्या आग्रहाखातर गेले खरे, पण तिथे जाऊन ते वर्तमानपत्र उघडून तोंडासमोर धरुन वाचत बसले होते.

  • 16/21

    त्यांनी प्रतिभा यांना पाहिलंसुद्धा नाही. पण होकार आला आणि त्यांचं लग्न ठरलं.

  • 17/21

    बारामतीमध्ये त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला होता.

  • 18/21

    शरद पवार यांच्या लग्नासाठी मुहुर्त काढण्यात आला नव्हता.

  • 19/21

    यशवंतराव चव्हाण व वसंतराव नाईक आल्यानंतर त्यांचं लग्न लावायचं असं ठरलं होतं.

  • 20/21

    लग्नाच्या दिवशीही दुपारी दोन वाजेपर्यंत शरद पवार कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत होते.

  • 21/21

    (सर्व फोटो सौजन्य : सुप्रिया सुळे / सोशल मीडिया)

TOPICS
मराठी बातम्याMarathi Newsराष्ट्रवादी काँग्रेस पक्षNCPशरद पवारSharad Pawar

Web Title: Ncp chief sharad pawar pratibha pawar 57th happy wedding anniversary supriya sule shared photos love story sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.