• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. raj thackeray loves this reel star content very much puneri boy atharva sudame specially called on stage of mns reel baaz awards svs

राज ठाकरेंचा आवडता रीलस्टार कोण? Reel Baaz कार्यक्रमात उभं राहायला सांगितलं आणि म्हणाले…

Raj Thackeray Favorite Reel Star: १ ऑगस्टला मनसेच्या विद्यार्थी सेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण रिलबाज पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं.

August 2, 2023 12:38 IST
Follow Us
  • Raj Thackeray Loves This Reel Star Content very Much Puneri Boy Atharva Sudame Specially Called On Stage Of MNS Reel Baaz Awards
    1/12

    १ ऑगस्टला मनसेच्या विद्यार्थी सेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण रिलबाज पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या सत्कार सोहळ्यात राज्यभरातील नामवंत मराठी रील्स स्टार इथे उपस्थित होते.

  • 2/12

    “तुम्ही नसता तर या देशात कधीच अराजक माजलं असतं. तुमच्यामुळे समाज वाईट गोष्टीकडे दुर्लक्ष करतो”, अशा शब्दांत राज ठाकरेंनी रील्सस्टार्सचं कौतुक केलं.

  • 3/12

    या सोहळ्यातील अनेक क्षण विशेष ठरले. जसे की, राज ठाकरे यांचं भाषण सुरु असताना श्रोत्यांमधून आय लव्ह यू राजसाहेब…असा आवाज आला. विशेष म्हणजे राज ठाकरेंनीही यावर उत्तर देत लव्ह यू म्हटलं.

  • 4/12

    याशिवाय कालच्या भाषणात पहिल्यांदाच राज ठाकरे यांनी आपला आवडता रीलस्टार कोण हे ही सांगितले

  • 5/12

    राज ठाकरे यांचे भाषण सुरु असताना त्यांची नजर एका रील्स स्टारवर पडली. तेव्हा,”अरे तू पण आला आहेस का? हा माझा अत्यंत आवडता. तू उभा राहा… तुझ्या सगळ्या गोष्टी मी पाहात असतो बरं का…, असं राज ठाकरे म्हणाले.

  • 6/12

    या कौतुकाने भारावून गेलेल्या या स्टारने सुद्धा राज ठाकरेंना हात जोडले. हा रील्स स्टार म्हणजे पुण्याचा अथर्व सुदामे…

  • 7/12

    अथर्व सुदामे हा २६ वर्षीय स्टार अस्सल पुणेरी बाजात मजेशीर रील्स बनवण्यासाठी ओळखला जातो. टोमणे, इरसालपणा अथर्वच्या रील्समध्ये भरपूर पाहायला मिळतो.

  • 8/12

    अथर्व सुदामेने मुलाखतीत सांगितल्यानुसार, त्याचे बी.कॉम पर्यंतचे शिक्षण पुण्यातून झाले आहे

  • 9/12

    अथर्वची पत्नी ऋचा सुदामे ही सुद्धा अनेकदा त्याच्या रील्समध्ये दिसते. २०२२ मध्ये अथर्व व ऋचा यांनी लव्ह मॅरेज केले होते.

  • 10/12

    अथर्वच्या युट्युब चॅनेलवर तब्ब्ल ४ लाख तर इंस्टाग्रामवर ७ लाखाहून अधिक फॉलोवर्स आहेत.

  • 11/12

    दरम्यान, अथर्व सुदामेसह विनायक माळीला सुद्धा मंचावर बोलावून राज ठाकरे यांनी विशेष कौतुक केले होते.

  • 12/12

    यापूर्वीही राज ठाकरे यांनी अंकिता वालावलकर, शंतनू रांगणेकर यांसह अनेक रील्स स्टार्सची कृष्णकुंजवर भेट घेतली होती.

  • (सर्व फोटो: फेसबुक)
TOPICS
ट्रेंडिंग न्यूजTrending NewsमनसेMNSराज ठाकरेRaj Thackeray

Web Title: Raj thackeray loves this reel star content very much puneri boy atharva sudame specially called on stage of mns reel baaz awards svs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.