-
अजित पवार यांनी अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे.
-
अजित पवार सरकारमध्ये सामील झाल्याने शिंदे गटातील आमदार नाराज असल्याची चर्चा होती.
-
यानंतर अजित पवारांना मुख्यमंत्री पदाची ऑफर दिल्याने ते सत्तेत सामील झाले, असंही बोललं जात होतं.
-
दरम्यान, अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी मनातील मुख्यमंत्र्याबाबत खुलासा केला आहे.
-
तिन्ही नेत्यांनी नुकतंच ‘पुढारी’ वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आहे.
-
यावेळी तिन्ही नेत्यांना मनातील मुख्यमंत्री कोण? अशी विचारणा करण्यात आली.
-
यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, “जे सध्या मुख्यमंत्री आहेत. तेच मनातील मुख्यमंत्री आहेत. ते आमच्या मनाच्या बाहेरचे मुख्यमंत्री नाहीत. तेच आमच्या मनातील मुख्यमंत्री आहेत.
-
अजित पवार म्हणाले, “सरकारमध्ये जात असताना आम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं की, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहतील. हे सांगितल्यावरच आम्ही सरकारमध्ये गेलो. त्यामुळे तेच मनातील मुख्यमंत्री असतील.”
-
मनातील मुख्यमंत्र्यावर बोलताना एकनाथ शिंदे यांनी मिश्किल विधान केलं. “या दोघांनी सांगितल्यावर मी काय सांगू …”, असं शिंदे म्हणाले.
मनातील मुख्यमंत्री कोण? अजित पवार, फडणवीस आणि एकनाथ शिंदेंनी घेतलं एकाच नेत्याचं नाव, म्हणाले…
अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी मनातील मुख्यमंत्र्याबाबत खुलासा केला आहे.
Web Title: Who is chief minister in heart ajit pawar eknath shinde and devendra fadnavis give answer rmm