-
जगातलं चौथं मोठं रेल्वेचं जाळं भारतात पसरलेलं आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात रेल्वे पोहोचली आहे.
-
भारतात जवळपास ७ हजारहून अधिक रेल्वे स्टेशन आहेत. या स्थानकातून २० हजारांपेक्षा अधिक रेल्वे निघतात.
-
IBEF.ORG च्या अहवालानुसार भारतात एकूण २२ हजार ५९३ रेल्वे धावतात. यामध्ये ९ हजार १४१ मालगाड्यांचा समावेश आहे.
-
पण तुम्ही कधी लक्ष दिले आहे का, प्रत्येक स्टेशनवर त्या स्थानकाचे नावं पिवळ्या पाटीवर काळ्या अक्षरातच का लिहल्या जाते?
-
तसेच रेल्वे स्टेशनवरील इतर दिशा निर्देशही पिवळ्या पाटीवर काळ्या अक्षरात का लिहण्यात येतात?
-
लाल, हिरवा, निळा,पांढरा, गुलाबी असे अनेक भडक रंग आहेत, मग पिवळाच रंग का निवडलाय, तुम्हाला माहिती आहे का..?
-
खरतंर ही अंधश्रध्दा नसून एक विज्ञान आहे. चला तर जाणून घेऊया यामागचं कारण काय?
-
पिवळा रंग तुम्हाला दूरनही आकर्षित करतो. तसेच पिवळा रंग डोळ्यांना सुखावणारा असतो.
-
लोको पायलटला दिवस आणि रात्री दोन्ही वेळा चमकदार पिवळा रंग स्पष्टपणे दिसतो.
-
त्यामुळे चालकाला स्टेशनचे नाव दूरुनच दिसते आणि त्याला थांबण्याचे सिग्नल मिळते.
-
पिवळा रंग डोळ्यांना त्रासदायक नसल्याने डोळ्यांना सुखावणारा असतो. त्यामुळे अंत्यत गर्दीच्या स्थानकावरही प्रवाशांना निर्देश फलक पाहणे सोपे जाते.
-
याचाच अर्थ इतर कोणत्याही रंगाच्या तुलनेत हा रंग लांबून सहज पाहता येतो. त्यामुळे रेल्वे स्टेशनचे नाव लिहण्यासाठी पिवळ्या रंगाच्या पाटीचा वापर केला जातो. (Photos : Indian Express)
रेल्वे स्टेशनचे नाव पिवळ्या रंगाच्या बोर्डवर काळ्या अक्षरातच का लिहिले जाते? ही अंधश्रध्दा आहे की विज्ञान? जाणून घ्या…
स्थानकाचे नाव पिवळ्या पाटीवर काळ्या अक्षरातच का लिहल्या जाते? जाणून घ्या खरं कारण…
Web Title: Do you know why is the name of the railway station written only on the yellow board pdb