-
Indian Railway Interesting Facts: रेल्वे हा भारतीयांच्या सर्वात जवळचा व आपुलकीचा विषय आहे. पण या रेल्वेविषयी अनेक अशा गोष्टी आहेत ज्या कदाचित आपल्यालाही ठाऊक नसतील
-
भारतीय रेल्वेने आपल्या ट्रेनच्या शेवटच्या डब्याच्या मागील बाजूस ‘X’ अक्षर का असते यामागील कारण उघड केले आहे
-
रेल्वे मंत्रालयाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर माहिती शेअर करून स्पष्ट केले की, पांढरे आणि पिवळे ‘X’ चिन्ह सूचित करते की ट्रेन कोणतेही डबे मागे न ठेवता पुढे गेली आहे
-
शेवटच्या डब्यावर ‘X’ अक्षर हे प्रवाशांसहित रेल्वे अधिकार्यांना पुष्टी देते की ट्रेन पूर्णतः निघून गेली आहे व कोणतेही डबे वेगळे किंवा मागे राहिलेले नाहीत.
-
जर एखादी ट्रेन एखाद्या स्टेशनवरून जात असेल आणि शेवटच्या डब्यावर ‘X’ चिन्ह नसेल, तर स्टेशन मास्टरने असे गृहीत धरले पाहिजे की ट्रेनला आपत्कालीन परिस्थितीचा सामना करावा लागतो आहे व ट्रेन शेवटच्या डब्याशिवाय पुढे जात आहे.
-
ही माहिती अधिका-यांसाठी ट्रेनच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आणि तिची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.
-
भारतीय रेल्वेच्या मते, ‘X’ चिन्हाचा वापर कोणत्याही विशिष्ट प्रकारच्या ट्रेन किंवा मार्गापुरता मर्यादित नाही. ही सर्व ट्रेन्समध्ये एक कॉमन पद्धत आहे.
-
वंदे भारत ट्रेनच्या शेवटच्या डब्ब्यावर हे चिन्ह लावलेलं नाही. कारण वंदे भारत ट्रेन एक हाय स्पीड ट्रेन आहे आणि पूर्णपणे एकसंध आहे. या ट्रेनच्या दोन्ही बाजूंना ड्रायव्हर केबिन असल्याने या ट्रेनला X चिन्ह देण्यात आलं नाही
-
लोकल ट्रेनमध्ये दोन्ही बाजूला ड्रायव्हर केबिन असल्याने तिथे अशी कोणतीही खूण नसते.
ट्रेनच्या शेवटच्या डब्यावर ‘X’ चा अर्थ काय? चिन्ह नसणं असते धोक्याची घंटा! लोकल व वंदे भारतला हा नियम का नाही?
Indian Railway Facts: भारतीय रेल्वेने आपल्या ट्रेनच्या शेवटच्या डब्याच्या मागील बाजूस ‘X’ अक्षर का असते? पण मुंबई लोकल आणि वंदे भारत एक्सस्प्रेसला हा नियम का लागू होत नाही याविषयी रेल्वेने उत्तर दिले आहे.
Web Title: Train last coach has x mark meaning without x sign it can indicate threat why mumbai local train and vande bharat is exception svs