• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. 9 dead in a fire accident in hyderabad residential building jshd import pdb

हैदराबादमध्ये रहिवाशी इमारतीला आग लागून ९ जणांचा होरपळून मृत्यू, घटनेचे फोटो पाहून तुमचेही हृदय हेलावून जाईल!

हैदराबादमधील नामपल्ली भागात एका बहुमजली इमारतीला कार दुरुस्तीदरम्यान लागलेल्या आगीत ९ जणांचा मृत्यू झाला असून १२ जण गंभीर जखमी झाले आहेत.

Updated: November 13, 2023 18:23 IST
Follow Us
  • Massive fire accident
    1/7

    हैदराबादच्या नामपल्ली भागात एक अत्यंत वेदनादायक दुर्घटना घडली आहे. येथील एका बहुमजली इमारतीला सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली, त्यात ९ जणांचा मृत्यू झाला. (पीटीआय फोटो)

  • 2/7

    आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि इमारतीत अडकलेल्या उर्वरित लोकांना सुखरूप बाहेर काढले. (एएनआय फोटो)

  • 3/7

    या अपघातात अद्याप १२ जण गंभीर जखमी असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (पीटीआय फोटो)

  • 4/7

    कारच्या दुरुस्तीदरम्यान ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. वास्तविक, गाडीच्या दुरुस्तीदरम्यान उठलेली ठिणगी जवळच्या गोदामात ठेवलेल्या केमिकलच्या ड्रमवर पडली, त्यामुळे ही आग लागली. (पीटीआय फोटो)

  • 5/7

    या आगीने भीषण रूप धारण केले आणि चार मजली इमारतीला त्याचा फटका बसला. या इमारतीत २१ जण अडकले होते. (एएनआय फोटो)

  • 6/7

    आगीच्या ज्वाला इतक्या तीव्र होत्या की अपार्टमेंटमध्ये वरच्या मजल्यावर राहणारे काही लोकं बाहेर पडू शकले नाहीत. या छायाचित्रांमध्ये तुम्ही पाहू शकता की, आग इतकी भीषण होती की इमारतीजवळ उभ्या असलेल्या कार आणि बाईक पूर्णपणे जळून खाक झाल्या आहेत. (पीटीआय फोटो)

  • 7/7

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात तळमजल्यावर कार दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे समोर आले आहे. या ठिकाणी प्लास्टिकच्या सात ड्रममध्ये ज्वलनशील रसायने ठेवण्यात आली होती. स्थानिक लोकांनी सांगितले की, सुरुवातीला स्टोअर परिसरात छोटी आग लागली पण काही वेळातच ती संपूर्ण अपार्टमेंटमध्ये पसरली. (एएनआय फोटो)

TOPICS
आगFireट्रेंडिंग न्यूजTrending NewsहैदराबादHyderabad

Web Title: 9 dead in a fire accident in hyderabad residential building jshd import pdb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.