-
चक्रीवादळ मिचॉन्गने आपले भयंकर रूप दाखवण्यास सुरुवात केली आहे. तामिळनाडूमध्ये विध्वंस घडवून आणल्यानंतर हे वादळ वेगाने आंध्र प्रदेशकडे सरकले आहे. आंध्र प्रदेशातील नेल्लोर आणि मछलीपट्टनममध्ये जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत आहे.
-
मिचौंग या चक्रीवादळाने आतापर्यंत एकट्या तामिळनाडूमध्ये ८ जणांचा बळी घेतल्याचे समजते.
-
मिचौंगच्या वादळाने कहर केला असून चेन्नईचे रस्ते पाण्याखाली गेले होते.
-
विमानतळ ते विमानतळापर्यंतचे रस्ते आणि रेल्वे मार्ग पाण्यात बुडालेले होते.
-
एनडीआरएफच्या २९ टीम मदत आणि बचावासाठी एकत्र काम करत आहे.
-
वादळामुळे झालेल्या विध्वंसाच्या नंतर कागदी होड्यांप्रमाणे वाहने पाण्यात तरंगताना दिसत आहेत.
-
लोकांची जीवित आणि मालमत्तेची मोठी हानी झाली आहे.
-
प्रत्येकजण सुरक्षित ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्ये एनडीआरएफची टीमही लोकांना मदत करत आहे. (सर्व फोटो: पीटीआय)
Cyclone Michaung : ‘मिचौंग’मुळे आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू, वादळामुळे चेन्नईत झालेल्या विध्वंसाचे भयावह फोटो पाहा
मिचौंगच्या वादळाने कहर केला असून चेन्नईचे रस्ते पाण्याखाली गेले होते.
Web Title: Cyclone michaung latest updates toofancyclone michaung latest updates toofan creates chaos in tamilnadu andhra pradesh see latest photos jshd import snk