Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. lookback2023 indian cricketer shubman gill and these athletes were most searched on google this year jshd import pdb

Google Search: यंदा ‘या’ ९ खेळाडूंना गुगलवर सर्वाधिक केले सर्च, यादीत एकमेव भारतीयाचा समावेश!

गुगलने २०२३ मधील सर्वाधिक ट्रेंडिंग खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. या यादीत एका भारतीय क्रिकेटपटूच्या नावाचाही समावेश आहे.

December 15, 2023 16:32 IST
Follow Us
  • These athletes were most searched on Google this year
    1/10

    दरवर्षीप्रमाणे या वर्षीही सर्च इंजिन गुगलने सर्वाधिक सर्च केलेल्या गोष्टींची यादी जाहीर केली आहे. या यादीत जगभरातील खेळाडूंचाही समावेश आहे. गुगलने २०२३ मधील सर्वात ट्रेंडिंग गोष्टींची यादी जारी केली आहे. या यादीत एका भारतीय खेळाडूच्या नावाचाही समावेश आहे. चला जाणून घेऊया कोणते आहेत हे खेळाडू…

  • 2/10

    डामर हॅमलिन
    डामर हॅमलिन हा एक अमेरिकन फुटबॉल खेळाडू आहे . जो राष्ट्रीय फुटबॉल लीगमध्ये बफेलो बिल्ससाठी खेळतो. या वर्षी २ जानेवारी रोजी फुटबॉल मैदानात नॅशनल फुटबॉल लीगदरम्यान त्याच्या छातीला दुखापत झाली, त्यामुळे त्याच्या हृदयाने काम करणे बंद केले. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या वर्षी गुगल सर्चमध्ये डामर हे नाव सर्वाधिक सर्च केले गेले. (फोटो स्रोत: @d.ham3/instagram)

  • 3/10

    कायलियन एमबाप्पे
    कायलियन एमबाप्पे हा फ्रेंच फुटबॉलपटू असून याला जगातील सर्वात जलद धावणाऱ्या फुटबॉलपटूंमध्ये गणले जाते. या फुटबॉलपटूने खूपच कमी कालावधीत अविश्वसनीय ट्रॅक रेकॉर्ड बनवला आहे. त्यामुळे याला गुगलवर सर्वाधिक सर्च केले गेले आहे. (फोटो स्रोत: Kylian Mbappé/फेसबुक)

  • 4/10

    ट्रॅव्हिस केल्स
    ट्रॅव्हिस केल्स हा नॅशनल फुटबॉल लीग स्टार आहे जो कॅन्सस सिटी चीफ्सकडून खेळतो. या वर्षी तो त्याच्या डेटिंग लाइफमुळे चर्चेत होता. तो प्रसिद्ध हॉलिवूड गायिका टेलर स्विफ्टला डेट करत असल्याची बातमी होती. (फोटो स्रोत: ट्रॅव्हिस केल्स/फेसबुक)

  • 5/10

    जा मोरंट
    जा मोरंट हा एक अमेरिकन बास्केटबॉल खेळाडू आहे. या वर्षी त्याचे नाव गुगल सर्चवर चौथ्या क्रमांकावर होते. (फोटो स्त्रोत: जा मोरंट/फेसबुक)

  • 6/10

    हॅरी केन
    हॅरी केन हा इंग्लिश फुटबॉलपटू आहे जो प्रीमियर लीग क्लब टोटेनहॅम हॉटस्परसाठी स्ट्रायकर म्हणून खेळतो. या वर्षी त्याचे नाव गुगलवर सर्वाधिक सर्च केले जाणारे पाचवे नाव होते. (फोटो स्रोत: हॅरी केन/फेसबुक)

  • 7/10

    नोव्हाक जोकोविच
    नोव्हाक जोकोविच हा सर्बियन टेनिसपटू आहे. या वर्षी त्याने यूएस ओपन २०२३ मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले. यावर्षी २४ ग्रँडस्लॅम जिंकण्यासोबतच तो पुरुष एकेरीत सर्वाधिक विजेतेपद पटकावणारा खेळाडूही ठरला. (फोटो स्त्रोत: नोव्हाक जोकोविच/फेसबुक)

  • 8/10

    कार्लोस अल्काराझ
    कार्लोस अल्काराझ हा स्पॅनिश टेनिसपटू आहे. २० वर्षीय कार्लोसने या वर्षी कारकिर्दीतील पहिले विम्बल्डन जेतेपद पटकावले. (फोटो स्रोत: @carlitosalcarazz/instagram)

  • 9/10

    रचिन रवींद्र
    रचिन रवींद्र हा भारतीय वंशाचा न्यूझीलंडचा तरुण क्रिकेटपटू आहे. रचिन रवींद्रचे वडील सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविडचे खूप मोठे चाहते आहेत. त्याने आपल्या मुलाचे नावही राहुलच्या ‘रा’वरून आणि सचिनच्या ‘चिन’वरून घेतले आहे. २०२३ च्या विश्वचषकासाठी न्यूझीलंडच्या संघात रचिनची निवड करण्यात आली होती. (फोटो स्रोत: @rachinravindra/instagram)

  • 10/10

    शुभमन गिल
    शुभमन गिल हा एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. यावर्षी, शुभमनने जानेवारी २०२३ मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात द्विशतक झळकावून सर्वांना आश्चर्यचकित केले. याशिवाय सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर आणि सैफ अली खानची मुलगी आणि अभिनेत्री सारा अली खानसोबतही त्याचे नाव जोडले जात होते, ज्यामुळे तो यावर्षी चर्चेत राहिला. (फोटो स्रोत: शुभमन गिल/फेसबुक)

TOPICS
क्रीडाSportsट्रेंडिंगTrendingट्रेंडिंग न्यूजTrending News

Web Title: Lookback2023 indian cricketer shubman gill and these athletes were most searched on google this year jshd import pdb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.