• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पाऊस
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. ayodhya new look see photos of ram mandir railway station ayodhya dham junction and maharishi valmiki international airport ayodhya dham jshd import sjr

PHOTO : प्रभू श्रीरामांच्या स्वागतासाठी सजली ‘अयोध्या नगरी’, राम मंदिरासह रेल्वे स्थानक आणि विमानतळाचा बदलला चेहरामोहरा

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. रेल्वे स्थानक आणि विमानतळाचा पुनर्विकास करण्यात आला आहे. ३० डिसेंबरला पंतप्रधान मोदी या प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत.

December 29, 2023 19:33 IST
Follow Us
  • Ayodhya
    1/9

    अयोध्येत तयार होत असलेल्या भव्य राम मंदिराच्या उद्घाटनाची तारीख जवळ आली आहे. प्रभू राम लल्ला २२ जानेवारी २०२४ रोजी त्यांच्या मंदिरात विराजमान होणार आहेत. त्याआधी अयोध्येत जय्यत तयारी सुरू आहे.

  • 2/9

    अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या भव्य राम मंदिराची झलक येथील रेल्वे स्टेशनवरूनच पाहता येत आहे. अयोध्या राम मंदिरासोबतच अयोध्या रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाचे कामही करण्यात आले आहे.

  • 3/9

    अयोध्या रेल्वे स्थानकाची वास्तुकला श्री रामजन्मभूमी मंदिरापासून प्रेरित आहे. रेल्वे स्थानकाच्या नव्या रुपासह प्रवाशांना विमानतळासारख्या सुविधा मिळणार आहेत.

  • 4/9

    एवढेच नाही तर नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने अयोध्येत आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधून तयार केले आहे. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० डिसेंबरला अयोध्येला जाणार आहेत.

  • 5/9

    पंतप्रधान मोदी अयोध्येच्या पुनर्विकसित रेल्वे स्टेशन आणि विमानतळासह अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत. रेल्वे स्टेशनच्या उद्घाटनासोबतच पंतप्रधान मोदी येथे दोन नवीन अमृत भारत आणि 6 नवीन वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील.

  • 6/9

    अयोध्येतील नवीन विमानतळाचे नाव महर्षि वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ अयोध्या धाम असे असणार आहे. अयोध्येतील हे विमानतळही राम मंदिराच्या धर्तीवर बांधण्यात आले आहे.

  • 7/9

    अयोध्या रेल्वे स्थानकाप्रमाणेच विमानतळ टर्मिनल इमारतीचे आतील भाग स्थानिक कला, चित्रे आणि भगवान श्री रामाचे जीवन दर्शविणारी विविध चित्रे यांनी सजवलेले आहेत.

  • 8/9

    या विमानतळाच्या मदतीने या भागात कनेक्टिव्हिटी, पर्यटन, व्यावसायिक उपक्रम आणि रोजगाराच्या संधी वाढतील.

  • 9/9

    अयोध्येतील रामजन्मभूमीवर रामललाच्या भव्य मंदिराचे उद्घाटन झाल्यानंतर २३ जानेवारी २०२४ पासून सर्वसामान्यांनाही दर्शनासाठी खुले करण्यात येईल.
    (फोटो: पीटीआय/एएनआय)

TOPICS
अयोध्याAyodhyaट्रेंडिंग न्यूजTrending Newsपंतप्रधान नरेंद्र मोदीPM Narendra Modiमराठी बातम्याMarathi Newsराम जन्मभूमीRam Janmabhoomi

Web Title: Ayodhya new look see photos of ram mandir railway station ayodhya dham junction and maharishi valmiki international airport ayodhya dham jshd import sjr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.