• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. india maldives diplomatic row hindu king established country how maldives became muslim nation jshd import asc

Maldives : अनेक शतकं हिंदू राजांच्या आधिपत्याखाली असणारं मालदीव मुस्लिम राष्ट्र कसं बनलं?

भारतीय नागरिक सोशल मीडियावर मालदीव सरकारचा निषेध नोंदवू लागले. तसेच एक्स या मायक्रोब्लॉगिग प्लॅटफॉर्मवर मालदीववर ‘बॉयकॉट मालदीव’ असा हॅशटॅगदेखील रविवारपासून ट्रेंड होत आहे.

Updated: January 8, 2024 22:34 IST
Follow Us
  • When did the Maldives become Muslim
    1/8

    Maldives India Controversy : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच लक्षद्वीप बेटांना भेट दिली. या सहलीदरम्यान मोदी यांनी तिथल्या सुंदर समुद्रकिनाऱ्यांवर स्वतःचे काही फोटो काढले आणि ते समाजमाध्यमांवर शेअर केले. परंतु, हे फोटो पाहून आणि मोदी यांच्याकडून चालू असलेलं भारतीय पर्यटनस्थळांचं कौतुक पाहून मालदीवमधील काही नेत्यांचा तीळपापड झाला. मालदीवमधल्या सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अपमानास्पद टीका केली. त्यांच्या लक्षद्वीपमधील फोटोंवर अपमानास्पद कमेंट्स केल्या. तर काही नेत्यांनी थेट भारतीय नागरिकांवर वर्णद्वेषी टीका केली. मालदीवमधील मोहम्मद मुईज्जू सरकारमधील मंत्र्यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट्स व्हायरल झाल्यानंतर भारतीय नागरिक, कलाकार आणि क्रिकेटपटूंनी समाजमाध्यमांवर त्यांचा संताप व्यक्त केला आहे. भारतीय नागरिक सोशल मीडियावर मालदीव सरकारचा निषेध नोंदवू लागले. तसेच एक्स या मायक्रोब्लॉगिग प्लॅटफॉर्मवर मालदीववर बहिष्कार टाकण्याचं, सहल किंवा पर्यटनासाठी मालदीवला न जाण्याचं आवाहन केलं जाऊ लागलं. ‘बॉयकॉट मालदीव’ असा हॅशटॅगदेखील रविवारपासून ट्रेंड होतं आहे.(Photo: Pexels)

  • 2/8

    दरम्यान, या सगळ्या घडामोडींमुळे भारतात मालदीवची खूप चर्चा चालू आहे. परंतु, तुम्हाला माहिती आहे का, चारही बाजूंनी हिंदी महासागराने वेढलेल्या या बेटावर अनेक शतकं हिंदू राजांची सत्ता होती. किंबहुना आजच्या मालदीवमधील अनेक प्रदेश हे या हिंदू राजांनी वसवले आहेत. (Photo: Pexels)

  • 3/8

    आपण मालदीवचा इतिहास पाहिला तर आपल्या लक्षात येतं की हा देश एकेकाळी हिंदू आणि बौद्ध धर्मीय लोकांचा देश होता. मालदीवचा इतिहास २५०० वर्षांहून अधिक जुना आहे. (Photo: Pexels)

  • 4/8

    या देशातील सर्वात प्राचीन रहिवासी बहुधा गुजराती होते जे इसवीसन पूर्व ५०० च्या दरम्यान भारतातील कालीबंगा येथून श्रीलंका आणि नंतर मालदीवमध्ये पोहोचले. मालदीवचे पहिले रहिवासी धेवीस म्हणून ओळखले जात होते. (Photo: Pexels)

  • 5/8

    मालदीवचा इतिहास पाहता या देशावर अनेक हिंदू राजांनी राज्य केलं आहे. तमिळ चोळ राजांनीही अनेक दशकं मालदीववर आपला झेंडा डौलाने फडकवला होता. चोळ राजांचं आरमारही मालदीवच्या समुद्रात तैनात होतं. (Photo: Pexels)

  • 6/8

    परंतु, १२ व्या शतकात या देशात मोठा बदल सुरू झाला. अरब व्यापार्‍यांच्या आगमनानंतर देशाचे हळूहळू मुस्लिम राष्ट्रात रूपांतर झाले. या अरब व्यापार्‍यांच्या प्रभावाखाली येथील लहानमोठे राजे आणि प्रजेने इस्लाम धर्म स्वीकारला. (Photo: Pexels)

  • 7/8

    २० व्या शतकापर्यंत मालदीवमध्ये सहा वेगवेगळ्या मुस्लिम शाह्यांनी राज्य केलं. भारतात इग्रजांचं राज्य होतं, त्याच काळात मालदीवही इंग्रजांच्या आधिपत्याखाली होतं. १९६५ मध्ये मालदीवला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळालं. या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत हा पहिला देश होता ज्याने मालदीवला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता दिली. (Photo: Pexels)

  • 8/8

    १९६० च्या दशकापर्यंत या देशाचे पूर्णपणे मुस्लिम राष्ट्रात रूपांतर झाले होते. आता इथला अधिकृत धर्म इस्लाम आहे. येथील ९८ टक्के लोकसंख्या मुस्लिम आहे. या देशाच्या संविधानानुसार गैरमुस्लिमांना मालदीवचं नागरिकत्व दिलं जात नाही. या देशाचे सरकारी नियमही इस्लामिक कायद्यांवर आधारित आहेत. (Photo: REUTERS)

TOPICS
आंतरराष्ट्रीय बातम्याInternational Newsट्रेंडिंगTrendingट्रेंडिंग न्यूजTrending Newsनरेंद्र मोदीNarendra ModiमालदीवMaldives

Web Title: India maldives diplomatic row hindu king established country how maldives became muslim nation jshd import asc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.