-
आता जवळपास प्रत्येक घरात स्वयंपाकासाठी एलपीजी गॅस सिलिंडर वापरला जातो.
-
एलपीजी गॅसच्या मदतीने स्वयंपाक करणे आजच्या काळात खूप सोपे झाले आहे.
-
त्यावर स्वयंपाक करताना पारंपारिक चुलीप्रमाणे जास्त वेळ आणि मेहनत लागत नाही.
-
त्यामुळे लहान गावे आणि शहरांमध्येही याचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे.
-
आपल्या घरामध्ये असणारा हा एलपीजी सिलिंडर लाल रंगाचा का असतो, असा प्रश्न तुम्हाला पडला आहे का?
-
एलपीजी गॅस ज्वलनशील आहे. गॅसला लगेच आग लागण्याची शक्यता असते. त्यामुळेच एलपीजी हा धोकादायक असतो.
-
अशा वेळी धोका दर्शवण्यासाठी या गोलाकार सिलिंडरला लाल रंग देण्यात येते. लाल रंग धोक्याचे प्रतीक आहे, असे मानले जाते. हे सिलिंडर हाताळताना लोकांनी अधिक सावधान राहावे, हेदेखील यामागील कारण असू शकते.
-
तर दुसरीकडे गॅस सिलिंडरचा आकार गोल का असतो? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल.
-
सिलिंडरचा आकार गोल असण्यामागचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे, त्यामध्ये असणाऱ्या गॅसवर दबाव निर्माण करणे.
-
गोल आकारामुळे सिलिंडरमधील गॅसवर दबाव टाकणे, तो कंप्रेस करणे सोपे होते.
-
यासह गोल आकारामुळे सिलिंडर सहजरीत्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाता येते. याच कारणांमुळे सिलिंडरचा आकार गोल असतो.
-
(फोटो सौजन्य : indianexpress)
LPG गॅस सिलिंडरचा रंग लाल आणि आकार गोलच का असतो? जाणून घ्या यामागचे महत्त्वाचे कारण
LPG Cylinder: गॅस सिलिंडरचा रंग लाल आणि आकार गोलाकार का असतो, जाणून घ्या…
Web Title: Why gas cylinder is cylindrical in shape and why is lpg gas cylinder always red in colour pdb