• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. republic day 2024 shivrajyabhishek ceremony of maharashtra tableau rajpath in delhi see a glimpse of the tableau different states snk

Republic Day 2024: दिल्लीत राजपथावर झळकला महाराष्ट्राचा शिवराज्यभिषेक सोहळा! संचलनात सहभागी राज्यांच्या चित्ररथांची पाहा झलक

Republic Day 2024 tableau :देशभरात प्रजासत्ताक दिन उत्साहत साजरा केला जात आहे. दिल्लीतील राजपथावर पदपथसंचलन आणि चित्ररथसंचलन पार पड

January 26, 2024 14:40 IST
Follow Us
    
Republic Day 2024 tableau
    Republic Day 2024 tableau : : देशभरात प्रजासत्ताक दिन उत्साहत साजरा केला जात आहे. दिल्लीतील राजपथावर पदपथसंचलन आणि चित्ररथसंचलन पार पडते. पदपथसंचलनामध्ये भारताच्या सैन्य दल, नौदल आणि हवाई दलाद्वारे शक्तीप्रदर्शन आणि चित्तथरारक कसरतींचे सादरीकरण केले जाते. त्याचसह देशातील विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांद्वारे चित्ररथसंचलन सादर केले जाते. यामध्ये विविध राज्य विविध संकल्पनांवर आधारित चित्ररथाचे सादरीकरण करतात. यंदाराजपथावरील चित्ररथसंचलनामध्ये सहभागी झालेल्याच चित्ररथाची एक झलक पाहू या. (फोटो सौजन्य – एनआय)
    Republic Day 2024 : छत्तीसगड चित्ररथ
    प्रजासत्ताक दिन २०२४च्या कर्तव्य पथावरील संचलनामध्ये छत्तीसगड राज्याने सहभाग घेतला होता.
    आदिवासी समाजात प्राचीन काळापासून असलेली लोकशाही चेतना आणि पारंपारिक लोकशाही मूल्ये राज्याच्या चित्ररथाद्वारे दर्शविण्यात आली. पारंपारिक कला आणि हस्तकलेचे चित्रण करण्यासाठी “बेल-मेटल आणि टेराकोटा कलाकृतींनी” ही सजवण्यात आली होती. (फोटो सौजन्य – एनआय)
    Republic Day 2024 : अरुणाचल प्रदेश चित्ररथ
    प्रजासत्ताक दिन २०२४च्या कर्तव्य पथावरील संचलनामध्ये अरुणाचल प्रदेशची चित्ररथ सहभागी झाला होता. त्यांचा चित्ररथ सिंगचुंग बुगुन व्हिलेज कम्युनिटी रिझर्व्ह, राज्यातील जैवविविधता हॉटस्पॉट दर्शवणारा होता. (फोटो सौजन्य – एनआय)
    Republic Day 2024 : गुजरात चित्ररथ
    प्रजासत्ताक दिन २०२४च्या कर्तव्य पथावरील चित्ररथसंलनामध्ये गुजरातचा चित्ररथही दिसला. या चित्ररथाची संकल्पना ‘धोर्डो: गुजरातच्या पर्यटन विकासाचे ग्लोबल आयकॉन’ यावर आधारित होती. (फोटो सौजन्य – एनआय)
    Republic Day 2024 : हरियाणाचा चित्ररथ
    प्रजासत्ताक दिन २०२४च्या राजपथावरील चित्ररथसंचलनामध्ये हरियाणाने सहभाग घेतला होता. यंदा हरियाणाच्या चित्ररथाची संकल्पना माझे कुटुंब- माझा पत्ता अशी आहे, जो हरियाणा सरकारचा एक उपक्रम आहे. हरियाणातील महिलांच्या सक्षमीकरणाचे पारंपारिक प्रतीक म्हणून हा चित्ररथ तयार करण्यात आला आहे. (फोटो सौजन्य – एनआय)
    Republic Day 2024 : झारखंड चित्ररथ
    प्रजासत्ताक दिन २०२४च्या कर्तव्य पथावरील चित्ररथसंलनामध्ये झारखंडने टसर सिल्कच्या समृद्ध वारशातून चित्ररथाच्या माध्यामधून प्रेक्षकांपर्यत पोहचवला. टस सिल्कच्या निर्मितीमध्ये आदिवासी महिलांचे कौशल्य या चित्ररथाद्वारे दर्शवण्यात आली. (फोटो सौजन्य – एनआय)
    Republic Day 2024 : लडाख चित्ररथ
    प्रजासत्ताक दिन २०२४च्या राजपथावरील चित्ररथसंचलनामध्ये यंदा लडाखचा चित्ररथही दिसला. हा चित्ररथ ‘विकसित भारत: लडाखच्या प्रवासात रोजगाराद्वारे महिलांचे सक्षमीकरण’ या संकल्पनेवर आधारीत होता. भारतीय महिला आईस हॉकी संघ, केवळ लडाखच्या खेळाडूंचा आहे जो नारी सशक्तीकरणाच्या या प्रवासाचे प्रतीक आहे. या पराक्रमाचे चित्रण करणारा चित्ररथ आणि बर्फामध्ये आईस हॉकी खेळताना महिला खेळाडू दिसत आहेत. (फोटो सौजन्य – एनआय)
    Republic Day 2024 : मध्य प्रदेश चित्ररथ
    प्रजासत्ताक दिन २०२४च्या कर्तव्य पथावर संचलनामध्ये मध्यप्रदेशनेही सहभाग घेतला होता. यंदा चित्ररथाची संकल्पना ‘आत्मनिर्भर आणि प्रगतीशील; राज्यातील महिला’ अशी होती. (फोटो सौजन्य – एनआय)
    Republic Day 2024 : मणिपूर चित्ररथ
    प्रजासत्ताक दिन २०२४च्या कर्तव्य पथावरील चित्ररथसंलनामध्ये मणिपूरने आपली ‘नारी शक्ती’ ‘इमा कीथेल’ सह दर्शवली. ही संपूर्णपणे महिलांनी चालवलेली जगातील एकमेव अशी ५०० वर्षे जुनी बाजारपेठ आहे. (फोटो सौजन्य – एनआय)
    Republic Day 2024 :ओडीसा चित्ररथ
    प्रजासत्ताक दिन २०२४च्या कर्तव्य पथावरील चित्ररथसंलनामध्ये महिला सक्षमीकरण तसेच राज्याच्या समृद्ध हस्तकला आणि हातमाग क्षेत्राच्या यशाचे चित्रण राज्याच्या चित्ररथाद्वारे करण्यात आले. (फोटो सौजन्य – एनआय)
    Republic Day 2024 : उत्तर प्रदेश चित्ररथ
    प्रजासत्ताक दिन २०२४च्या राजपथावरील चित्ररथसंचलनामध्ये उत्तर प्रदेशने सहभाग घेतला होता. चित्ररथाची संकल्पना ‘अयोध्या: विकसित भारत-समृद्ध विरासत’ यावर आधारित होती. चित्ररथाचा पुढचा भाग राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे प्रतीक होतो जो, त्यांचे बालपणीचे रूप दाखवते.(फोटो सौजन्य – एनआय)
    Republic Day 2024 :राजस्थान चित्ररथ
    प्रजासत्ताक दिन २०२४च्या राजपथावरील चित्ररथसंचलनामध्ये राजस्थानचा चित्ररथही सहभागी झाला होता. चित्ररथाची संकल्पना ही राजस्थानच्या उत्सव साजरा करणाऱ्या संस्कृतीसह जोपासलेल्या महिलांच्या हस्तकला उद्योगांच्या विकास यावर आधारित होती. (फोटो सौजन्य – एनआय)
    Republic Day 2024 :महाराष्ट्र चित्ररथ
    प्रजासत्ताक दिन २०२४च्या कर्तव्य पथावरील चित्ररथसंलनामध्ये महाराष्ट्राचा चित्ररथाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यंदा शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या महोत्सवावर आधारित हा महाराष्ट्राचा चित्ररथ होता. या चित्ररथात छत्रपती शिवाजी महाराजांचा अन्याय आणि शोषण याविरोधातील संघर्ष दाखविण्यात आला होता. या चित्ररथात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बालपणापासून ते स्वराज्यनिर्मितीपर्यंतचे प्रसंग दर्शविण्यात आले होते. (फोटो सौजन्य – पीटीआय)
TOPICS
ट्रेंडिंगTrendingट्रेंडिंग न्यूजTrending Newsप्रजासत्ताक दिन २०२५Republic Day 2025भारताचा प्रजासत्ताक दिनIndias Republic Day

Web Title: Republic day 2024 shivrajyabhishek ceremony of maharashtra tableau rajpath in delhi see a glimpse of the tableau different states snk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.