• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. best places to visit in kolhapur know the famous six places should be seen at least once asp

पर्यटकांनो कोल्हापूरात फिरायला जाताय? तर ‘या’ प्रसिद्ध ठिकाणांना नक्की भेट द्या

कोल्हापूरातील या प्रसिद्ध ठिकाणांना एकदा तरी भेट द्या…

Updated: February 1, 2024 13:43 IST
Follow Us
  • Best Places to Visit in Kolhapur Know The Famous Six Places should be seen at least once
    1/8

    कोल्हापूर म्हंटल की, तांबडा पांढरा रस्सा आणि झणझणीत मिसळ आपल्याला नक्कीच आठवते. कोल्हापुरात येणारा प्रत्येक पर्यटक याची चव चाखल्याशिवाय राहत नाही.

  • 2/8

    तसेच याबरोबरच कोल्हापूर हे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून देखील महाराष्ट्राचे एक महत्वाचे ठिकाण आहे. तर आज आपण कोल्हापूरातील काही प्रसिद्ध ठिकाणांबद्दल जाणून घेऊ.

  • 3/8

    श्री अंबाबाई मंदिर, कोल्हापूर : कोल्हापूरात आलेला प्रत्येक पर्यटक श्री अंबाबाई यांच्या चरणी नस्तमस्तक होतो. तसेच या प्रसिद्ध मंदिरात तुम्हाला मंदिराचे नक्षीकाम, रचना, स्तंभाची कलाकृती आदी अद्भुत कलेचा नजारा पाहता येईल.

  • 4/8

    दख्खनचा राजा (ज्योतीबा मंदिर) : कोल्हापूर शहराच्या वायव्य दिशेस जेमतेम १५ किलोमीटर अंतरावर एका डोंगरावर जोतिबाचे मंदिर आहे.

  • 5/8

    किल्ले पन्हाळगड : पन्हाळगड छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजीराजे यांच्या जीवनातील अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आहे. इथे धान्य कोठार, धर्मकोठी, तबक उद्यान, तीन दरवाजा, अंबरखाना या ठिकाणी पर्यटकांना पाहायला मिळतील.

  • 6/8

    न्यू पॅलेस म्युझियम : न्यू पॅलेस म्युझियम छत्रपती शाहू महाराज यांचे निवासस्थान म्हणून ओळखले जाते. राजवाड्याच्या तळमजल्यावर तुम्हाला शादी जीवनाच्या विविध वस्तू पाहायला मिळतील.

  • 7/8

    रंकाळा तलाव : रंकाळा तलावात संध्याकाळच्या वेळी पर्यटक व नागरिकांची मोठी गर्दी असते. इथे तुम्ही बोटिंगचा अनुभव सुद्धा घेऊ शकता आणि लहान मुलांना खेळासाठी गार्डन सुद्धा बांधण्यात आले आहे.

  • 8/8

    श्री श्रेत्र सिद्धिगिरी महासंस्थान कणेरी मठ, कोल्हापूर: इथे एक प्राचीन शिव मंदिर आहे. तसेच मेण व सिमेंट शिल्पांच्या मदतीने ग्रामीण जीवन चित्रीत केले आहे ; जे पाहण्यासारखे आहेत. (सर्व फोटो : लोकसत्ता )

TOPICS
कोल्हापूरKolhapurपर्यटनTourism

Web Title: Best places to visit in kolhapur know the famous six places should be seen at least once asp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.