• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. information about animals that went to space before humans did dha

तुम्हाला माहीत आहे का मानवपूर्वी ‘कोणत्या’ प्राण्यांनी केला आहे अंतराळ प्रवास? पाहा ही रांजक माहिती

अंतराळात मानवाआधी कोणकोणत्या प्राणी, कीटकांनी प्रवास केला आहे; तसेच त्यातील किती प्रयोग यशस्वी झाले आहेत; त्याबद्दल क्रिस्टीना हॅरिसनने डिस्कव्हर वाइल्ड लाइफसाठी लिहिलेल्या एका लेखातील रंजक माहिती जाणून घ्या.

February 28, 2024 20:16 IST
Follow Us
  • animals who went to space before humans
    1/7

    माशी
    पृथ्वीवरून १९४७ साली घरात घोंगावणाऱ्या माश्यांना अंतराळात पाठविण्यात आले होते. अमेरिकन शास्त्रज्ञ वैश्विक किरणोत्सर्गाच्या [Cosmic Radiation] प्रभावाबद्दल अभ्यास करीत होते. माश्या या आनुवंशिकदृष्ट्या मानवासारख्याच असतात म्हणून प्रयोगासाठी त्यांची निवड करण्यात आली होती. माश्यांनी भरलेले कॅप्सुल न्यू मेक्सिकोमध्ये उतरवल्यानंतर त्या कॅप्सुलमधील सर्व माश्या जिवंत होत्या. तसेच त्या माश्यांवर रेडिएशन कोणताही परिणाम झाला नसल्याचे दिसत होते. या यशस्वी प्रयोगानंतर मात्र अंतराळ पाठविण्यात येणाऱ्या प्राण्यांची रांग लागण्यास सुरुवात झाली. [Photo credit -Freepik]

  • 2/7

    माकड आणि वानर
    माकडांच्या विविध प्रजाती मिळून एकूण ३२ माकडांनी अंतराळ प्रवास केला आहे. त्यांमधील सर्वांत पहिले माकड हे रीसस मॅकाक प्रजातीचे. अल्बर्ट नावाचे दुसरे माकड होते. ३१ जानेवारी १९६१ साली ग्रेट ऐप, हॅम या चिपांझीला अंतराळात यशस्वीरीत्या पोहोचवण्यात आले होते. इतकेच नाही, तर हॅमला सुखरूप पृथीवरदेखील परत आणण्यात आले. हॅमने १९८३ साली अखेरचा श्वास घेतला.
    [Photo credit -Freepik]

  • 3/7

    उंदीर
    अनेक वर्षांपासून अंतराळ प्रवासाचा मानवी शरीरावर कसा परिणाम होऊ शकतो हे पाहण्यासाठी उंदरांचा वापर केला जात आहे. उंदीर गुरुत्वाकर्षणाच्या सूक्ष्म बदलांसारख्या परिस्थितीशी खूप लवकर जुळवून घेतो. मात्र, असे असले तरी १९५० साली अंतराळात पाठविल्या गेलेल्या सर्वांत पहिल्या उंदराचा पॅराशूट बिघाड आणि रॉकेटचे विघटन यांमुळे दुर्दैवी मृत्यू झाला.
    [Photo credit -Freepik]

  • 4/7

    श्वान
    माजी सोविएत युनियनअंतर्गत १९५७ साली लाइका नावाच्या श्वनाला अंतराळ पाठविण्यात आले होते. लाइका ही भटकी कुत्री होती. लाइका पृथ्वीभोवती फिरणाऱ्या प्राण्यांमध्ये सर्वांत पहिली होती. मात्र, असे असले तरी ती परत कधीच पृथ्वीवर परतणार नसल्याचे ठरले होते. तिला केवळ एक दिवसाचे जेवण आणि सात दिवसांचा प्राणवायू पुरविण्यात आला होता.
    [Photo credit -Freepik]

  • 5/7

    बेडूक
    बेडूक उड्डाण १९७० साली नासाने दोन बुलफ्रॉग्ससह, ऑर्बिटिंग फ्रॉग ओलोथिथ स्पेसक्राफ्ट लाँच केले. ‘ओलोटिथ’ हा शब्द बेडूकांच्या कानाच्या आतील भागाशी संबंधित असून, तो संतुलन यंत्रणेला सूचित करतो. हा प्रयोग अवकाश प्रवासामुळे होणाऱ्या मोशन सिकनेसचे परिणाम तपासण्यासाठी तयार करण्यात आला होता. [Photo credit -Freepik]

  • 6/7

    मासा
    अंतराळात पोहोचणारा पहिला जलचर हा दलदलीत, नदीत आढळणारा मम्मीचॉग [mummichog] नावाचा मास असून, त्यासाह त्याची ५० अंडीदेखील होती. नासाने १९७३ साली पृथ्वीवर पाण्यात फिरणाऱ्या प्राण्यांवर सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाचा परिणाम पाहण्यासाठी हा प्रयोग केला होता.
    [Photo credit -Freepik]

  • 7/7

    कोळी
    १९६९साली म्हणजेच, चंद्रावरील पहिली मानव मोहीम यशस्वी झाल्यानंतर प्राणी अवकाशात सोडण्यावर कमी भर देण्यात आला होता. मात्र, शास्त्रज्ञांना अजूनही प्राण्यांच्या कार्यांवर, सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाच्या होणाऱ्या प्रभावांचा अभ्यास करण्यात रस होता. म्हणून १९७३ साली, अंतराळात जाऊनदेखील कोळी जाळे विणू शकतात का? हे पाहण्यासाठी अनिता आणि अरबेला नावाचे दोन कोळी, एका प्रयोगात वापरले गेले.
    [Photo credit -Freepik]

TOPICS
नासाNasaप्राणीAnimalराष्ट्रीय विज्ञान दिवस २०२४National Science Day 2024

Web Title: Information about animals that went to space before humans did dha

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.