-
मुंबईत पार पडलेल्या मिस वर्ल्ड स्पर्धेच्या फेरीमध्ये जगभरातल्या सौंदर्यवतींनी रॅम्पवॉक केलं. भारतीय स्पर्धक सिनी शेट्टीच्या सौंदर्याची यावेळी साऱ्यांनाच भुरळ पडली! (एक्स्प्रेस फोटो अमित चक्रवर्ती)
-
शनिवारी संध्याकाळी मुंबईत ७१व्या मिस वर्ल्ड स्पर्धेसाठीचा रॅम्प वॉक सोहळा पार पडला. यावेळी जगभरातल्या सौंदर्यवतींनी बेस्ट डिझायनर आणि मल्टिमीडिया चॅलेंजमध्ये सहभाग नोंदवला. (एक्स्प्रेस फोटो अमित चक्रवर्ती)
-
यंदाच्या ७१व्या मिस वर्ल्ड ‘ब्युटि विथ ए पर्पज’ सोहळ्यामध्ये एकूण ११७ सौंदर्यवतींनी सहभाग घेतला आहे. २१ दिवस ही स्पर्धा चालणार आहे. (एक्स्प्रेस फोटो अमित चक्रवर्ती)
-
मिस वर्ल्ड या स्पर्धेची सुरुवात ब्रिटनमध्ये १९५१ च्या सुमारास एरिक मोर्ले यांच्या पुढाकाराने झाली होती. त्यामुळे या स्पर्धेला जगातील सर्वात प्रदीर्घ काळ सुरू असलेल्या सौंदर्य स्पर्धेचा मान मिळाला आहे. (एक्स्प्रेस फोटो अमित चक्रवर्ती)
-
तब्बल २८ वर्षांनंतर भारतात मिस वर्ल्ड स्पर्धेचं आयोजन होत आहे. त्यामुळे यंदाच्या स्पर्धेचं भारताच्या दृष्टीने महत्त्व आहे. तरुण महिलांना भविष्यात नेतृत्व करण्यासाठी प्रेरणा देणे हा या स्पर्धेचा एक हेतू आहे. (एक्स्प्रेस फोटो अमित चक्रवर्ती)
-
याआधी ऐश्वर्या राय, प्रियांका चोप्रा आणि मानुषी छिल्लर यांनी मिस वर्ल्ड खिताब जिंकून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिष्ठा अनेक पटींनी वाढवली आहे. (एक्स्प्रेस फोटो अमित चक्रवर्ती)
-
यंदाच्या ७१व्या मिस वर्ल्ड स्पर्धेची अंतिम फेरी येत्या ९ मार्च रोजी मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे पार पडणार आहे. (एक्स्प्रेस फोटो अमित चक्रवर्ती)
-
या स्पर्धेच्या अंतिम फेरीचं थेट प्रक्षेपण ९ मार्च रोजी संध्याकाळी ७.३० वाजेपासून सोनी लिव्हवर दाखवलं जाईल. (एक्स्प्रेस फोटो अमित चक्रवर्ती)
Photo: मिस वर्ल्ड स्पर्धेत जगभरातील सौंदर्यवतींचा मेळा; भारतीय स्पर्धक सिनी शेट्टीच्या रॅम्प वॉकची साऱ्यांनाच भुरळ!
७१व्या मिस वर्ल्ड स्पर्धेच्या मुंबईत पार पडलेल्या ‘ब्युटि विथ ए पर्पज’ फेरीमध्ये ११७ सौंदर्यवतींनी सहभाग घेतला होता.
Web Title: Sini shetty 71st miss world 2024 best designer award finale on 9th march iehd import pmw