• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. pranlal bhogilal vintage car collection museum indian historical vehicles in kathawada ahmedabad 9211475 pmw 88 iehd import

काळाची आवर्जून पाहावीशी वाटणारी चाकं! विंटेज कार्स, अवलिया संग्राहक आणि त्याचं भन्नाट कलेक्शन!

अहमदाबादजवळील शांत काठवाडा इस्टेटमध्ये वसलेल्या ऑटो वर्ल्ड व्हिंटेज कार म्युझियममध्ये प्राणलाल भोगीलाल यांच्या २०० हून अधिक व्हिंटेज कार्सचा मोठा संग्रह आहे!

Updated: March 22, 2024 17:58 IST
Follow Us
  • Pranlal Bhogilal historic vehicles, Pranlal Bhogilal collector India, Vintage and Classic Car Club of India (VCCCI) founder, Pranlal Bhogilal Auto World Vintage Car Museum
    1/9

    प्राणलाल भोगीलाल (१९३७-२०११) म्हणजे विंटेज कार्सच्या जगातील एक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्व. त्यांनी तरुण वयातच अशा कार्सचा संग्रह करायला सुरुवात केली. स्वातंत्र्योत्तर काळात ज्यांची आर्थिक स्थिती फारशी चांगली नव्हती, अशा राजघराण्यांकडून त्यांनी अनेक कलावस्तू, जुन्या कलाकृती, दागिने आणि कार्ससारख्या गोष्टी मिळवल्या. (कारचं मॉडेल: १९३१ लॅन्सिया डिलाम्बडा ड्युअल काउल व्हियोटी टूरर)

  • 2/9

    इतर कुणाहीपेक्षा आधी भोगीलाल यांना या अमूल्य वारशाची किंमत कळली. त्यामुळे आज ते भारतातील सर्वात मोठ्या ऐतिहासिक कार संग्राहकांपैकी एक आहेत. एका अंदाजानुसार त्यांच्याकडे अशा तब्बल २०० कार्स आहेत! (कारचं मॉडेल: १९३६ अकेडस १६/७० स्पेशल स्पोर्ट्स टूरर)

  • 3/9

    विशेष म्हणजे, भोगीलाल यांनी कधीही त्याच्या संग्रहातून कोणतीही कार विकली नाही. अनेकदा तर त्याच्या आवडीची प्रशंसा करणाऱ्या ओळखीच्या व्यक्तींकडून भेटवस्तू म्हणून त्यांना अशा कार्स मिळाल्या. (कारचं मॉडेल: १९३७ मर्सिडीज-बेंझ ५४०के कॅब्रिओलेट बी)

  • 4/9

    भारतातील ऐतिहासिक वाहन संग्राहकांमधील अग्रगण्य म्हणून, भोगीलाल यांनी विंटेज अँड क्लासिक कार क्लब ऑफ इंडिया (VCCCI) ची स्थापना केली. (कारचं मॉडेल: १९३२ इन्व्हिक्टा एस-टाईप स्पोर्ट्स टूरर)

  • 5/9

    भोगीलाल यांनी देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना भारताचा वारसा जपण्यासाठी १९६० पूर्वी देशात उत्पादित मोटारींच्या निर्यातीवर बंदी आणण्याचा निर्णय घेण्यास राजी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. (कारचं मॉडेल: रोल्स-रॉइस फँटम थ्री सेडांका डीव्हिले)

  • 6/9

    विंटेज कारचं एक संग्रहालय सुरू करण्याचं त्यांचं आयुष्यभराचं स्वप्न होतं. २००९ मध्ये ते पूर्णत्वास आलं. अहमदाबादजवळील काठवाडा येथे त्यांच्या पुढाकाराने ऑटो वर्ल्ड व्हिंटेज कार म्युझियमचं उद्घाटन करण्यात आलं. (कारचं मॉडेल: १९२७ हिस्पानो-सुइझा एच६सी कॅब्रिओलेट डीव्हिले)

  • 7/9

    काठवाडातील या संग्रहालयाचं दास्तान नाव असून ते २२०० एकरमध्ये पसरलेलं आहे. हे संग्रहालय अतिशय नयनरम्य वातावरणात असून मोटारगाड्यांचा एक सुंदर असा संग्रह इथे पाहायला मिळतो. (कारचं मॉडेल: १९३१ बेंटले ८ लिटर टूरर)

  • 8/9

    या संग्रहालयात शंभरहून अधिक कार, मोटारसायकल, घोडागाड्या आणि पारंपारिक बैलगाड्या आहेत. त्यामुळे हे संग्रहालय विंटेज वाहनांच्या शौकिनांसाठी एक प्रकारे पर्वणीच आहे! (कारचं मॉडेल: १९४८ डेमलर डीई ३६)

  • 9/9

    भोगीलाल यांच्या कामगिरीची जागतिक पातळीवर FIVA (Fédération Internationale des Véhicules Anciens) नंही घेतली आहे. फिवानं त्यांच्या अग्रगण्य हेरिटेज हॉल ऑफ फेम पुरस्कारासाठी भोगीलाल यांना नामांकन दिलं होतं. (१९२८ रोल्स-रॉयस फँटम वन लिमोझिन)

TOPICS
अहमदाबादAhmedabadकारCarनॅशनल न्यूजNational Newsफोटो गॅलरीPhoto Galleryमराठी बातम्याMarathi Newsसंग्रहालय

Web Title: Pranlal bhogilal vintage car collection museum indian historical vehicles in kathawada ahmedabad 9211475 pmw 88 iehd import

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.