-
जगातील अनेक ठिकाणे आहेत जी तेथील काही विशिष्ट गोष्टींमुळे चर्चेत राहतात.
-
जगात अशाही काही गोष्टी आहेत, ज्या तुम्हाला माहिती नाहीत आणि ते ऐकल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल.
-
पृथ्वीवरील काही ठिकाणे इतकी गूढ आहेत की त्यांचा विचार करून तुमचं डोकं गोंधळून जाईल.
-
सर्वांनाच माहिती आहे की, पृथ्वी सूर्याच्या भोवती प्रदक्षिणा घालते. यामुळे संपूर्ण जगात दिवस आणि रात्रीची वेळ वेगवेगळी असते. जगभरात सर्व ठिकाणी सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ विभिन्न असते.
-
म्हणजे भारतात जेव्हा सकाळी ६.०० वाजले असतील, तेव्हा अमेरिकेत रात्र असेल.
-
पण तुम्हाला माहित आहे का की, जगात असा देखील एक देश आहे जिथे सूर्य फक्त ४० मिनिटांसाठी मावळतो. म्हणजेच या देशात रात्र ही फक्त ४० मिनिटांची असते.
-
नॉर्वेमधील हेमरफेस्ट शहरात फक्त ४० मिनिटांचीच रात्र असते. येथे रात्री ठीक १२:४३ वाजता सूर्य मावळतो आणि त्यानंतर फक्त ४० मिनिटांनी म्हणजे रात्री १:३० च्या सुमारास उगवतो.
-
नॉर्वे हा देश युरोप खंडाच्या उत्तरेस वसलेला आहे. येथे मे महिन्यापासून जुलै महिन्यापर्यंत सुमारे ७६ दिवस सूर्य फक्त ४० मिनिटांसाठी मावळतो. मात्र, ही परिस्थिती वर्षभर नसते. हे फक्त अडीच महिन्याच्या काळात होते. अडीच महिने नॉर्वेमध्ये रात्र फक्त ४० मिनिटांची असते.
-
नॉर्वे हा देश संपूर्ण जगभरात ‘मध्यरात्री सूर्याचा देश’ म्हणूनही ओळखला जातो. नॉर्वे उत्तर ध्रुवाच्या अगदी जवळ असल्यामुळे याठिकाणी खूप थंडी पडते. (फोटो सौजन्य : Pexels)
सुरक्षा रक्षकांना आता ‘खाकी वर्दी’, शासनाची मान्यता; महाराष्ट्रात १ मेपासून…