-
मुकेश अंबानी यांची कन्या ईशा अंबानी आपल्या आलिशान जीवनशैलीसाठी बहुतेकदा सोशल मीडियावर चर्चेत असते. ईशा अंबानीने अलीकडेच न्यूयॉर्कमधील मेट गाला २०२४ मध्ये आपल्या सुंदर लुकसह हजेरी लावली होती.
-
जाणून घेऊया ईशा अंबानीच्या नवीनतम कार कलेक्शनबद्दल.
-
‘मर्सिडीज बेंझ एस क्लास’ ही अनेक सेलिब्रिटी आणि व्यापारींकडे असणारी कार आहे. सध्या या कारची किंमत ₹१.७७ ते १.८६ कोटी आहे. ही कार ३.० लिटर, सहा-सिलेंडर पेट्रोल किंवा डिझेल इंजिनसह येते.
-
ईशाकडे ‘बि.एम. डब्लू-७’ सीरीजची कार देखील आहे ज्याची किंमत सध्या ₹१.८२ ते ₹१ .८४ कोटी आहे. ‘मर्सिडीज बेंझ एस क्लास’ प्रमाणे, यामध्ये ही ३.०-लीटर पेट्रोल आणि डिझेल इंजिनचे पर्याय दिले जाते.
-
ईशाच्या गॅरेजमधील दुसरी सर्वात महागडी कार बेंटले अर्नेज आर आहे. या अल्ट्रा लक्झरी लिमोझिन कर ची किंमत ₹२.२५ कोटी आहे.
-
ईशाकडे असलेली ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडलेली पोर्श टॉप-स्पेस जीटीएस ट्रिम एसची किंमत ₹१.४८ कोटी आहे.
-
ईशा अंबानीच्या गॅरेजमधील सर्वात महागड्या कार कलेक्शनची कार म्हणजे ‘रोल्स रॉयस कलिनन’ची किंमत सुमारे ₹६.९५ कोटी आहे.
ईशा अंबानीकडे आहे मर्सिडीज ते पोर्श पर्यंत एकाहून एक सरस गाड्या, जाणून घ्या ‘या’ नवीनतम कार कलेक्शनबद्दल
अंबानी कुटुंबातील सदस्यांप्रमाणेच ईशा अंबानीकडे ही आलिशान गाड्यांचे कलेक्शन आहे. जाणून घेऊया ईशा अंबानीचे कार कलेक्शनबद्दल.
Web Title: Isha ambani owns these expensive cars from mercedes to porsche know about her latest car collection arg 02