• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. from childhood friends to life partners anant ambani and radhika merchant adorable love story spl

‘अशी’ आहे अनंत आणि राधिकाची प्रेम कहाणी! वाचा बालपणीची मैत्री ते जोडीदार बनण्यापर्यंतची गोष्ट, कोविडच्या काळात दोघेही…

Anant-Radhika Love Story: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट आज लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यांच्या लग्नाला देश-विदेशातील प्रसिद्ध व्यक्ती हजेरी लावणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघेही बालपणीचे चांगले मित्र होते आणि त्यांच्या बॉन्डिंगचे रुपांतर हळूहळू प्रेमात झाले.

Updated: July 12, 2024 16:05 IST
Follow Us
  • anant ambani
    1/9

    आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि हेल्थकेअर कंपनी चालवणारे वीरेन मर्चंट यांची कन्या राधिका मर्चंट आज १२ जुलै रोजी विवाहबंधनात अडकणार आहेत.

  • 2/9

    या लग्नाची बऱ्याच दिवसांपासून चर्चा होती. या लग्नात सहभागी होण्यासाठी देश-विदेशातील प्रसिद्ध व्यक्ती मुंबईत पोहोचल्या आहेत. हे लग्न मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथील Jio वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये होणार आहे.

  • 3/9

    आता आपण, अनंत आणि राधिकाची बालपणीच्या मैत्रीपासून ते लाइफ पार्टनर बनण्यापर्यंतची गोष्ट जाणून घेऊया. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनंत आणि राधिका लहानपणापासून एकमेकांना ओळखतात कारण दोघेही एकाच सोशल सर्कलमध्ये वाढले आहेत.

  • 4/9

    अनंत आणि राधिका लहानपणापासून चांगले मित्र होते. त्यानंतर त्यांच्या नात्याचे रुपांतर हळूहळू प्रेमात झाले. मात्र, दोघांनीही ही गोष्ट मीडियाच्या चर्चेपासून दूर ठेवली. २०१८ मध्ये जेव्हा त्यांचा एक रोमँटिक फोटो व्हायरल झाला तेव्हा त्यांच्या नात्याबद्दल चर्चा सुरु झाल्या.

  • 5/9

    व्हायरल झालेल्या फोटोमध्ये अनंत आणि राधिकाने ऑलिव्ह ग्रीन रंगाचे मॅचिंग आउटफिट घातले होते. राधिका जेव्हा ईशा अंबानी आणि आकाश अंबानी यांच्या लग्नासह इतर कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये दिसली तेव्हा त्यांच्या नात्याबद्दलच्या गोष्टी आणखीनच तीव्र झाल्या.

  • 6/9

    याशिवाय, २०२० मध्ये कोविड दरम्यान टाळेबंदीत अनंत आणि राधिका दोघेही एकत्र जामनगरमध्ये अडकल्याचेही काही मीडिया रिपोर्ट्समध्ये समोर आले होते. नंतर राधिकानेही याबद्दल एक वक्तव्य केले होते.

  • 7/9

    तिच्या नात्याचे हे गुपित सर्वांसोबत शेअर करताना राधिका म्हणाली होती, “मार्च २०२० मध्ये अनंत आणि मी इथे टाळेबंदीत अडकलो आणि आम्ही आमच्या कुटुंबियांना अनेक महिने भेटू शकलो नाही. त्यांच्यापासून दूर राहणे खूप अवघड होते. पण त्या काळात आम्ही इथे एकत्र आयुष्यातील लहान लहान गोष्टींचा आनंद घ्यायला शिकलो”.

  • 8/9

    त्याचवेळी अनंतनेही त्याच्या एका मुलाखतीत राधिकावरील प्रेम व्यक्त केले आहे, “राधिका ही माझी सर्वात मोठी ताकद आहे. मला राधिका मिळाल्याने मी स्वतःला भाग्यवान समजतो. ती माझ्या आजारपणात नेहमीच माझ्या पाठीशी उभी राहिली.” अशा शब्दात अनंतने राधिकाबद्दलचे प्रेम व्यक्त केले होते.

  • 9/9

    दरम्यान, अनंत-राधिकाचा भव्य विवाह सोहळा तीन दिवस चालणार आहे. १२ जुलै रोजी अनंत आणि राधिका अग्नीला साक्षी मानून सात फेरे घेतील. १३ जुलैला ‘शुभ आशीर्वाद’ घेतील आणि १४ जुलैला विवाहसोहळा किंवा ‘मंगल उत्सव’ पूर्ण होईल. (Photos Source: @ambani_update/instagram)
    (हे पण वाचा: PHOTOS : अनंत राधिकाच्या लग्नाआधी, अंबानी कुटुंबाचे अँटिलिया निवासस्थान आकर्षक रोषणाईने)

TOPICS
ट्रेंडिंगTrendingमनोरंजनEntertainmentमराठी बातम्याMarathi News

Web Title: From childhood friends to life partners anant ambani and radhika merchant adorable love story spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.