Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. narali purnima 2024 why do koli brothers offer coconuts to the sea on the narali poornima read pujan vidhi and importance of this day sjr

Narali Purnima 2024 : ‘नारळी पौर्णिमे’ला कोळी बांधव समुद्राची पूजा का करतात? जाणून घ्या या सणाबद्दल खास गोष्टी

Narali Purnima 2024 : या दिवशी मच्छीमार समाज महासागरांचे हिंदू देव वरुण यांची पूजा करतात.

August 19, 2024 02:07 IST
Follow Us
  • Narali Purnima 2024 why do koli brothers offer coconuts to the sea on the narali poornima read pujan vidhi and importance of this day
    1/13

    श्रावण महिन्याला धार्मिक सण, उत्सव आणि व्रत यांचा महिना म्हणतात. या महिन्यापासून अनेक सणांना सुरुवात होते.

  • 2/13

    यातील नारळी पौर्णिमा हा सण महाराष्ट्रासह गोवा आणि गुजरात किनारपट्टीवर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नारळी पौर्णिमा सणाला श्रावणी पौर्णिमा म्हटले जाते.

  • 3/13

    नारळी पौर्णिमा हा सण फक्त रक्षाबंधनाच्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी समुद्र देवता वरुण याची मनोभावे पूजा केली जाते.

  • 4/13

    मासेमारी आणि समुद्राशी संबंधित इतर कामात गुंतलेल्या लोकांद्वारे, यात कोळी बांधवांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो, जे धुमधडाक्यात हा सण साजरा करतात.

  • 5/13

    महाराष्ट्रासह विविध राज्यांच्या किनारपट्टी भागात प्रामुख्याने साजरा केला जाणारा हा सण मासेमारीच्या हंगामाची सुरुवात करतो.

  • 6/13

    मच्छीमार कोळी बांधव हंगाम सुरू होण्यापूर्वी या दिवशी जल आणि महासागराची देवता वरुणाची विशेष पूजा करतात. या दिवशी भगवान वरुणला नारळ अर्पण करण्याची प्रथा आहे.

  • 7/13

    यावेळी वरुण देवाला अर्थात समुद्राला नारळ अर्पण करत कोळीबांधव समुद्रातून भरपूर मासे मिळावेत म्हणून विशेष प्रार्थना करतात. नारळ हे फळ शुभसूचक असून, ते सर्जनशक्‍तीचेही प्रतीक मानले गेले आहे.

  • 8/13

    पूजेचा विधी पूर्ण केल्यानंतर मच्छीमार आपल्या सजवलेल्या बोटी समुद्रात घेऊन जातात आणि शुभकार्य सुरू केल्यानंतर ते काही वेळातच समुद्रातून किनाऱ्यावर परततात आणि कुटुंबासह आनंद साजरा करतात.

  • 9/13

    नारळी पौर्णिमेला पूजा करणाऱ्या भाविकांचा असा विश्वास आहे की, समुद्राची पूजा केल्याने वरुण देव प्रसन्न होतात आणि समुद्राच्या सर्व संकटांपासून त्यांचे रक्षण करतात. या दिवशी भगवान शिवाचीही पूजा केली जाते.

  • 10/13

    असे मानले जाते की, नारळाचे तीन डोळे हे त्रिनेत्रधारी शिवाचे प्रतीक आहेत आणि श्रावण महिना हा भगवान शंकराचा आवडता महिना आहे. या दिवशी भगवान शिवाला नारळ आणि त्यांच्या आवडत्या वस्तू अर्पण केल्या जातात.

  • 11/13

    या सणानिमित्ताने कोळी बांधव बोटींना रंगरंगोटी करून सजवतात. बोटींना पताका लावतात. या उत्सवादरम्यान नारळांना विशेष महत्त्व आहे, मच्छीमार देवांना फळांचा प्रसाद देतात, ज्याचा वापर नंतर गोड पदार्थ बनवण्यासाठी केला जातो.

  • 12/13

    या दरम्यान फळे, सुका मेवा आणि काही दुग्धजन्य पदार्थ खाल्ले जातात. मात्र, उपवासाच्या वेळी नारळापासून बनवलेल्या पदार्थांना सर्वाधिक पसंती मिळते.

  • 13/13

    निसर्गाप्रती आपले प्रेम, आदर आणि कृतज्ञता दर्शविण्यासाठी या दिवशी झाडे लावली जातात. कोळी बांधव या सणानिमित्त आपल्या गावठाणात गायन आणि नृत्य जत्रा अशा कार्यक्रमांचे आयोजन करतात. (सर्व फोटो सौजन्य – एक्स्प्रेस फोटो – नरेंद्र वासकर)

TOPICS
मराठी बातम्याMarathi Newsमुंबई न्यूजMumbai Newsरक्षाबंधन २०२५Raksha Bandhan 2025

Web Title: Narali purnima 2024 why do koli brothers offer coconuts to the sea on the narali poornima read pujan vidhi and importance of this day sjr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.