-
आज देशभरात राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा केला जात आहे.
-
गेल्या वर्षी 23 ऑगस्ट रोजी म्हणजेच आजच्या दिवशी चंद्रावर यशस्वीपणे उतरून अशी कामगीरी करणारा चौथा देश म्हणून मान मिळवला होता.
-
या दिवशी इस्रोचे चांद्रयान-3 चे विक्रम रोव्हर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरले. यासह भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाणारा पहिला देश ठरला आहे.
-
पण तुम्हाला माहिती आहे का की या मोहिमेचे नाव आधी चांद्रयान नव्हते. चांद्रयानाला हे नाव कधी आणि कोणी दिले ते जाणून घेऊया.
-
चांद्रयान यापूर्वी चांद्रयान म्हणून नाही तर सोमयान म्हणून ओळखले जात होते. पण 1999 मध्ये अटल सरकारने याला नवीन नाव दिले होते.
-
त्यावेळी केंद्रात अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार होते. त्यांच्या सरकारने चांद्रयान मोहिमेला मान्यता दिली होती. यापूर्वी शास्त्रज्ञांनी या मोहिमेचे नाव ‘सोमयान’ असे सुचवले होते.
-
पण अटलबिहारी वाजपेयींनी ते बदलून चांद्रयान करण्यास सांगितले. दरम्यान या मिशनचे पहिले नाव ‘सोमयान’ हे एका संस्कृत कवितेवरुन प्रेरीत होते.
-
पण तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी मोहिमेचे नाव बदलून ते चांद्रयान करण्याबाबत म्हटले होते की, “देश आता आर्थिक शक्ती म्हणून उदयास येत असल्याने भारत आता चंद्रावर अनेक अन्वेषणात्मक सहली करेल.”
(Photos Source: @isro/Twitter)
चांद्रयान मिशन आधी ‘या’ नावाने ओळखले जायचे; जाणून घ्या कोणत्या पंतप्रधानांनी बदलले नाव?
Chandrayaan-3: 23 ऑगस्ट 2023 रोजी चांद्रयान-3 चे यशस्वी लँडिंग करून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारा पहिला देश बनण्याचा मान भारताला मिळाला आहे.
Web Title: Chandrayaan 3 do you know that former prime minister atal bihari vajpayee had changed name of india moon mission spl