• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पार्थ पवार
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ-अशी ही बनवाबनवी
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. these 10 famous personalities have done mba from navya naveli nanda college iim ahmedabad spl

Photos : ‘नायका’ ते ‘मेक माय ट्रीप’च्या फाऊंडरपर्यंत, ‘या’ कॉलेजमध्ये देशातील दिग्गजांनी घेतलंय एमबीएचं शिक्षण

These 10 famous personalities have done MBA from IIM Ahmedabad : अभिनेते अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा हिने अलीकडेच आयआयएम अहमदाबादमध्ये प्रवेश घेतला आहे, हे महाविद्यालय देशातील टॉप महाविद्यालयांपैकी एक आहे. येथूनच ती एमबीएचे शिक्षण घेणार आहे. या महाविद्यालयातून इतर कोणत्या मोठ्या व्यक्तींनी शिक्षण घेतले आहे?, ते जाणून घेऊया.

Updated: September 4, 2024 10:10 IST
Follow Us
  • Navya Naveli Nanda College
    1/14


    अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा सध्या तिच्या शिक्षणामुळे चर्चेत आहे. तिने अलीकडेच आयआयएम अहमदाबादमध्ये प्रवेश घेतला आहे, हे कॉलेज देशातील टॉप महाविद्यालयांपैकी एक आहे. येथून ती एमबीएचा अभ्यास करणार आहे.(Nvya Naveli Nanda/ Instagram)

  • 2/14

    देशातील अनेक दिग्गजांनी या महाविद्यालयातून शिक्षण घेतले आहे. आज त्यांच्यापैकी काही मोठ्या कंपन्यांचे सीईओ आहेत तर काहींची स्वतःची कंपनी आहे. येथून एमबीए केलेल्या १० सेलिब्रिटींबद्दल जाणून घेऊया. (Photo: Indian Express)

  • 3/14

    १- विक्रम तलवार:
    विक्रम तलवार ईएक्सएल सर्विस होल्डिंग्स कंपनीचे सह-संस्थापक आणि माजी सीईओ देखील राहिले आहेत. (Photo Source: Vikran Talwar/LinkdIn)

  • 4/14

    २- के. व्ही. कामथ: माजी एमडी, आयसीआयसीआय बँकेचे सीईओ आणि पद्मभूषण विजेते केव्ही कामथ यांनीही आयआयएम अहमदाबादमध्ये शिक्षण घेतले आहे. कामथ हे इन्फोसिसचे माजी अध्यक्ष आणि न्यू डेव्हलपमेंट बँकेचे (ब्रिक्स) पहिले अध्यक्ष आहेत. (Photo: Indian Express)

  • 5/14

    ३- शिखा शर्मा: शिखा शर्मा २००९ ते २०१८ या काळात ॲक्सिस बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ होत्या. (Photo: Indian Express)

  • 6/14

    ४- फाल्गुनी नायर: ब्यूटी आणि लाइफस्टाइल रिटेल कंपनी Nykaa च्या संस्थापक आणि CEO फाल्गुनी नायर यांनी देखील IIM अहमदाबादमधून शिक्षण घेतले आहे. (Photo: Indian Express)

  • 7/14

    ५- संजीव बिखचंदानी: Info Edge आणि Naukri.com चे संस्थापक आणि कार्यकारी उपाध्यक्ष संजीव बिखचंदानी यांनी IIM अहमदाबादमधून MBA देखील केले आहे. यासोबतच २०२० मध्ये त्यांना देशातील चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्री देऊन सन्मानित करण्यात आले आहे. (Photo: Indian Express)

  • 8/14

    ६- दीप कालरा: ऑनलाइन ट्रॅव्हल कंपनी मेक माय ट्रिपचे संस्थापक आणि ग्रुप सीईओ, दीप कालरा यांनी आयआयएम अहमदाबादमधून एमबीए देखील केले आहे. (Photo: Indian Express)

  • 9/14

    ७- अजय सिंग बंगा: सध्या जागतिक बँक समूहाचे अध्यक्ष असलेले आणि याआधी त्यांनी मास्टरकार्डचे अध्यक्ष आणि सीईओ पद भूषवलेले अजय सिंग बंगा यांचेही शिक्षण येथेच झाले आहे. (Photo: Indian Express)

  • 10/14

    ८- अभिनय चौधरी: बिगबास्केट आणि लाँड्रीमेटचे सह-संस्थापक अभिनय चौधरी यांनीही आयआयएम अहमदाबादमधून एमबीए केले आहे. (The Financial Express)

  • 11/14

    ९- माधवी पुरी बुच: सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) च्या प्रमुख माधवी पुरी बुच सध्या चर्चेत आहेत. माधवी पुरी यांनीही आयआयएम अहमदाबादमधून एमबीएचे शिक्षण घेतले आहे. (Photo: Indian Express)

  • 12/14

    १०- चेतन भगत : प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांनीही येथून मार्केटिंगमध्ये एमबीए केले आहे. (Photo: Indian Express)

  • 13/14

    या सेलिब्रिटींशिवाय, इतर अनेक प्रसिद्ध चेहऱ्यांनी आयआयएम अहमदाबादमधून शिक्षण घेतले आहे जे आज देशात आणि परदेशात विविध उच्च पदांवर कार्यरत आहेत. (Photo: Indian Express)

  • 14/14

    हेही वाचा : Photos : बॉलीवूडच्या ‘या’ टॉप अभिनेत्री केवळ अभिनयच करत नाहीत तर व्यवसायीक देखील आहेत, करतात करोडोंची कमाई

TOPICS
अमिताभ बच्चनAmitabh Bachchanचेतन भगतChetan Bhagatनव्या नवेली नंदाNavya Naveli NandaमनोरंजनEntertainmentमराठी बातम्याMarathi News

Web Title: These 10 famous personalities have done mba from navya naveli nanda college iim ahmedabad spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.