• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पावसाळी अधिवेशन
  • आजचा जोक
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. ganesh chaturthi 2024 ganesha bappa favorite modak is not only sweet dish it is also useful for this health problems arg

Ganesh Chaturthi 2024: गणपती बाप्पाचा आवडता ‘मोदक’ केवळ गोडच नाही; ‘या’ आरोग्य सामस्येसाठी सुद्धा ठरतो उपयोगी

जाणून घ्या गणपती बाप्पाच्या आवडत्या मोदकाचे सेवन केल्याने होणारे आरोग्यासाठी फायदे.

September 6, 2024 17:29 IST
Follow Us
  • Ganesh Chaturthi 2024
    1/9

    ७ सप्टेंबरपासून देशभरात गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. हा सण १० दिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. आपल्या लाडक्या बाप्पासाठी भक्त त्यांच्या घरी आणि सार्वजनिक ठिकाणी बाप्पाची भव्य मूर्ती स्थापित करतात आणि त्यांची पूजा करतात.

  • 2/9

    गणेशोत्सवानिमित्त गणपती बाप्पाचा प्रसादही खास असतो. बाप्पाचा सर्वात आवडता पदार्थ म्हणजे मोदक. बाप्पाला मोदक खूप आवडतात अशा अनेक पौराणिक कथा आहेत.

  • 3/9

    पण तुम्हाला माहित आहे का की बाप्पाचे हे आवडते मोदक आरोग्यासाठीही खूप फायदेशीर मानले जातात. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की मोदक खाल्ल्याने शरीरातील अनेक रोग दूर होतात आणि शरीरातील सर्व आवश्यक घटकांचे संतुलन स्थापित होते.

  • 4/9

    तांदळाचे पीठ, तूप, नारळ, गूळ, हिरवी वेलची, सुका मेवा यासारख्या पौष्टिक गोष्टींपासून मोदक बनवले जातात. या सर्व गोष्टींमुळे मोदक चविष्ट आणि आरोग्यदायी बनवतात. चला जाणून घेऊया मोदकाचे आरोग्यदायी फायदे.

  • 5/9

    मोदक बनवण्यासाठी तुपाचा वापर केला जातो. तूप बद्धकोष्ठतेपासून मुक्त होण्यास आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते. हे खाल्ल्याने बद्धकोष्ठता आणि पचनाच्या इतर समस्यांपासून आराम मिळतो.

  • 6/9

    मोदक बनवण्यासाठी नारळाचा वापर केला जातो, ज्यामध्ये ट्रायग्लिसराइड्स आढळतात. हे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी खूप उपयुक्त आहे.

  • 7/9

    मोदक बनवण्यासाठी नारळाबरोबरच सुक्या मेव्याचाही वापर केला जातो. ड्राय फ्रुट्समुळे शरीरातील खराब कोलेस्टेरॉल कमी होऊन चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवण्यास मदत होते.

  • 8/9

    मोदकामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स अत्यंत कमी प्रमाणात आढळतो म्हणून ते वजन कमी करण्यास मदत करते.

  • 9/9

    मोदकामध्ये अँटी-एजिंग कंपाऊंड्स असतात, जे थायरॉईड ग्रंथी निरोगी ठेवतात. याशिवाय मोदकाचे सेवन केल्याने मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते. नारळ, गूळ, हिरवी वेलची आणि तूप यांसारख्या पौष्टिक घटकांनी तयार केलेले मोदक खाल्ल्याने तुमच्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. हे तुम्हाला रोग, विषाणू आणि संक्रमणांपासून सुरक्षित ठेवते.

TOPICS
गणेश चतुर्थी २०२४Ganesh Chaturthi 2024गणेशोत्सव २०२४Ganeshotsavमराठी बातम्याMarathi News

Web Title: Ganesh chaturthi 2024 ganesha bappa favorite modak is not only sweet dish it is also useful for this health problems arg 02

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.