-
देशातील सर्वात श्रीमंत मुलीचे नाव येताच बहुतेकांना भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानीचा विचार येतो. पण प्रत्यक्षात देशातील सर्वात श्रीमंत कन्येचा खिताब अनन्या बिर्लाच्या नावावर आहे.
-
अनन्या ही आदित्य बिर्ला ग्रुपचे चेअरमन कुमार मंगलम बिर्ला यांची मुलगी आहे.
-
अनन्या बिर्लाची संपत्ती ईशा अंबानीपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे.
-
२०२४ फोर्ब्स अब्जाधीशांच्या यादीनुसार, कुमार मंगलम बिर्ला हे २२.६ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह जगातील ९०व्या आणि भारतातील सातव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत.
-
अनन्या बिर्ला हिंडाल्को, ग्रासिम, आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेल आणि आदित्य बिर्ला मॅनेजमेंट कॉर्पोरेशनची सदस्य आहे.
-
याशिवाय वयाच्या १७ व्या वर्षी तिने ‘स्वतंत्र मायक्रोफिन प्रायव्हेट लिमिटेड’ नावाची मायक्रोफायनान्स कंपनी स्थापन केली होती.
-
अनन्याला व्यवसायाशी संबंधित अनेक पुरस्कार मिळाले आहेत, ज्यात २०१६ च्या यंग बिझनेस पर्सन ऑफ द इयर पुरस्काराचाही समावेश आहे.
-
व्यवसायासोबतच अनन्या बिर्लाने गायनाच्या जगातही चांगले नाव आणि पैसा कमावला आहे. ‘होल्ड ऑन’ आणि ‘लिविन’ द लाइफ’ यांसारख्या हिट इंग्रजी गाण्यांसाठी ती ओळखली जाते.
-
मात्र, अनन्याने नुकतीच गायनातून क्षेत्रात काम न करण्याचे जाहीर केले आहे. नेट वर्थबद्दल बोलायचे झाल्यास, मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनन्या १३ अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे १,०९,१८४ कोटी रुपयांच्या संपत्तीची मालक आहे.
-
मात्र, अनन्याच्या उत्पन्नाची सार्वजनिकरित्या कुठेही नोंद नाही. पण ती दोन कंपन्यांची सीईओ असल्याने तिची तगडी संपत्ती सगळ्यांनाच माहीत आहे.
-
रिलायन्स ग्रुपचे मालक मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानीबद्दल बोलायचे तर, ती रिलायन्स ग्रुपच्या रिटेल व्यवसायात आघाडीवर आहे आणि तिची एकूण संपत्ती १०० दशलक्ष डॉलर्स म्हणजे सुमारे ८३९.८८ कोटी रुपये आहे. (Photos Source: @ananyabirla/instagram)
Richest Daughter In India: ईशा अंबानीपेक्षाही अधिक संपत्ती असलेली देशातील सर्वात श्रीमंत मुलगी कोण?
Richest daughter in India: अनन्याने वयाच्या १७ व्या वर्षी मायक्रोफायनान्स कंपनीही सुरू केली. व्यवसायासोबतच तिने गायनातही आपली कारकीर्द घडवली.
Web Title: Successful and country richest daughter of indian billionaire kumar mangalam birla spl