• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. special honor to ratan tata by queen elizabeth in 2009 read the list of many awards from around the world arg

२००९ साली राणी एलिझाबेथ यांनी केला होता रतन टाटा यांचा खास सन्मान; वाचा जगभरातील अनेक पुरस्कारांची यादी

RATAN TATA HONOUR AWARDS: भारताचे दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांनी बुधवारी वयाच्या ८६ व्या वर्षी मुंबईतील कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. देशाच्या प्रगतीमध्ये टाटा यांचे योगदान खुप महत्त्वाचे आहे. रतन टाटा यांचे जीवन लोकांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांना जगभरात अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले गेले आहे. जाणून घेऊया याबाबत.

Updated: October 10, 2024 17:29 IST
Follow Us


  • Ratan Tata Award List
    1/12

    भारताचे दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांनी बुधवारी वयाच्या ८६ व्या वर्षी मुंबईतील कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. देशाच्या प्रगतीमध्ये टाटा यांचे योगदान खुप महत्त्वाचे होते. रतन टाटा यांचे जीवन लोकांसाठी प्रेरणादायी आहे. आपल्याच कंपनीत कर्मचारी म्हणून काम करणारे रतन टाटा आपल्या व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या ६० टक्क्यांहून अधिक रक्कम दान करायचे.

  • 2/12

    रतन टाटा यांना देशातीलच नव्हे तर जगभरातील अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. इंग्लंडच्या राणी एलिझाबेथ यांनी रतन टाटा यांना पुरस्कार प्रदान केला होता. रतन टाटा यांना सन्मानित करण्यात आलेल्या पुरस्कारांबद्दल जाणून घेऊया.

  • 3/12

    2000 मध्ये रतन टाटा यांना देशाचा तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

  • 4/12

    पद्मविभूषण हा देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान आहे जो २००८ साली रतन टाटा यांना प्रदान केला होता.

  • 5/12

    2001 साली ओहायो स्टेट युनिव्हर्सिटीने रतन टाटा यांना मानद डॉक्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन पुरस्काराने सन्मानित केले.

  • 6/12

    उरुग्वे सरकारने रतन टाटा यांना 2004 मध्ये ओरिएंटल रिपब्लिक ऑफ उरुग्वे पुरस्काराने सन्मानित केले. त्याच वर्षी एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने त्यांना मानद डॉक्टर ऑफ टेक्नॉलॉजी पुरस्काराने सन्मानित केले.

  • 7/12

    २००६ साली रतन टाटा यांना आयआयटी मद्रास तर्फे मानद डॉक्टर ऑफ सायन्स पुरस्कार देण्यात आला.

  • 8/12

    २००७ साली लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्सने रतन टाटा यांना ऑनररी फेलोशिप देऊन सन्मानित केले.

  • 9/12

    राणी एलिझाबेथ यांनी रतन टाटा यांना ऑनररी नाइट कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर (KBE) पुरस्काराने सन्मानित केले. इटली सरकारने देखील रतन टाटा यांना ग्रँड ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ मेरिट ऑफ द इटालियन रिपब्लिक पुरस्काराने सन्मानित केले.

  • 10/12

    येल युनिव्हर्सिटीने रतन टाटा यांना लीजेंड इन लीडरशिप अवॉर्ड, द एशियन अवॉर्ड फॉर बिझनेस पर्सन ऑफ द इयर या अवॉर्डने सन्मानित केले.

  • 11/12

    २०१६ साली रतन टाटा यांना फ्रेंच सरकारने कमांडर ऑफ द लीजन ऑफ ऑनरने सन्मानित केले.

  • 12/12

    रतन टाटा यांना २०२३ मध्ये किंग चार्ल्सद्वारे ऑनररी ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया (AO) प्रदान करण्यात आला. २०२३ मध्येच, महाराष्ट्र सरकारने देखील रतन टाटा यांना महाराष्ट्र उद्योग रत्न पुरस्काराने सन्मानित केले.
    (सर्व फोटो: इंडियन एक्सप्रेस)

TOPICS
ट्रेंडिंगTrendingमराठी बातम्याMarathi Newsरतन टाटाRatan Tata

Web Title: Special honor to ratan tata by queen elizabeth in 2009 read the list of many awards from around the world arg 02

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.