• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • एकनाथ खडसे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. this indian state does not have a single railway station know whats the reason spl

भारतातील ‘या’ राज्यात आतापर्यंत ट्रेन धावली नाही; इथे एकही रेल्वे स्टेशन नाही, कारण काय?

भारतीय रेल्वे अनेक दशकांपासून आपली सेवा देत आहे. आजही प्रवाशांना मोठ्या प्रमाणात ट्रेनमधून प्रवास करायला आवडते, तर भारतातील ट्रेनमध्ये जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध आहेत, परंतु देशात असे एक राज्य देखील आहे जिथे अद्याप रेल्वे स्टेशन नाही.

Updated: November 17, 2024 10:40 IST
Follow Us
  • Sikkim Railway Sikkim Railway News Indian Railways Indian Railways News Indian Railways News Update
    1/9

    भारतीय रेल्वे हे जगातील सर्वात मोठे नेटवर्क आहे. जे अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्यातून दररोज लाखो-कोटी प्रवासी प्रवास करतात. भारतात 1853 मध्ये पहिल्यांदा रेल्वे धावली, तेव्हापासून रेल्वेमध्ये अनेक घडामोडी घडल्या. (Photo: Pexels)

  • 2/9

    भारतीय रेल्वे अनेक राज्ये आणि शहरांना जोडते, पण एक राज्य असे आहे की जिथे आजही एकही रेल्वे स्टेशन नाही. कोणत आहे हे राज्य चला जाणून घेऊ. (Photo: Indian Express)

  • 3/9

    आपण ज्या राज्याबद्दल बोलत आहोत त्याचे नाव सिक्कीम आहे. इथे अजून रेल्वे स्टेशन नाही. (Photo: Pexels)

  • 4/9

    दरम्यान, सिक्कीम १६ मे १९७५ रोजी भारताचे २२ वे राज्य म्हणून सामील झाले, तेव्हापासून तिथे आजतागायत एकही रेल्वे स्टेशन किंवा कोणतीही रेल्वे लाईन नाही. (Photo: Pexels)

  • 5/9

    सिक्कीममधील रेल्वे ट्रॅकच्या बांधकामात अडथळा आणणारे मुख्य कारण म्हणजे तेथील भौगोलिक स्थिती आणि खडबडीत भूभाग. (Photo: Pexels)

  • 6/9

    सिक्कीम हे डोंगराळ राज्य आहे, त्यामुळे येथे तीव्र उतार, खोल दऱ्या आणि अप्रत्याशित हवामान आहे. अशा स्थितीत येथील जमीन रेल्वेच्या जाळ्यासाठी म्हणावी तशी मजबूत नाही. (Photo: Pexels)

  • 7/9

    सिक्कीम हे एक असे राज्य आहे जे हिरव्यागार जंगलांनी वेढलेले आहे आणि ही जंगलं अनेक प्राण्यांचे निवासस्थानही आहेत. अशा परिस्थितीत सिक्कीम संवेदनशील क्षेत्रात येते. सिक्कीममध्ये रेल्वेचे जाळे उभारले तर ते पर्यावरणासाठी चांगले राहणार नाही, भविष्यात भयावह परिस्थिती पाहावी लागेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. (Photo: Pexels)

  • 8/9

    सिक्कीममध्ये रेल्वेचे जाळे नसले तरी येथे बांधलेले रस्ते खूपच सुंदर आहेत. राज्यात रस्त्यांचे जाळे सुस्थितीत आहे आणि शेजारच्या पश्चिम बंगालमध्ये बागडोगरा विमानतळ आहे. इतकंच नाही तर जर तुम्हाला ट्रेनने सिक्कीमला जायचं असेल तर तुम्हाला बंगालमधील सिलीगुडी किंवा जलपाईगुडी रेल्वे स्टेशनवर उतरावं लागेल. तिथून बस किंवा टॅक्सीने सिक्कीमला सहज पोहोचता येते. (Photo: Pexels)

  • 9/9

    दरम्यान, सिक्कीमला पुढील काही वर्षांत पहिले रेल्वे स्टेशन मिळणार आहे. या स्टेशनचे बांधकाम सुरू आहे. ज्याचे नाव ‘रंगपो रेल्वे स्टेशन’ असेल. हे रेल्वे स्टेशन रंगपो शहर आणि सिक्कीममधील पाक्योंग जिल्हा, गंगटोक जिल्हा आणि मंगन जिल्हा या तीन जिल्ह्यांना सेवा देईल. ज्यामध्ये तीन प्लॅटफॉर्म आणि ४ रेल्वे ट्रॅक असणार आहेत. (Photo: Pexels)
    हेही पाहा –‘या’ देशातील गुन्हेगारी संपत आल्याने कारागृह पडले होते ओस; जेल कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या वाचवण्यासाठी शेजारी देशातून आणले गेले कैदी

TOPICS
ट्रेंडिंगTrendingभारतीय रेल्वेIndian Railway

Web Title: This indian state does not have a single railway station know whats the reason spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.